PHOTO : प्रसिद्ध क्रिकेटरशी साखरपुडा, 12 वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमासाठी मोडलं लग्न, धर्माची भिंत उभी राहिली अन्...

या अभिनेत्रीचं प्रसिद्ध क्रिकेटरशी साखरपुडा झाला होता. पण 12 वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमासाठी तिने तो मोडला. पण त्यांच्या नात्याला नाव मिळालं नाही. नंतर 12 वर्ष लहान अभिनेत्याशी लग्न केलं पण...

May 11, 2024, 13:31 PM IST
1/10

90 च्या दशकातील ही अभिनेत्री तिच्या सौंदर्याने सर्वांना वेड लावलं होतं. एकामागून एक हिट चित्रपट देत तिने एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केलं होतं. तिचं करिअरमध्ये जेवढी यशस्वी होती पण तिचं लव्ह लाइफ खूप गाजली होती. 

2/10

ही अभिनेत्री अनेकांच्या प्रेमात पडली पण आज आयुष्यात एकटीच मुलांसोबत राहत आहे. आम्ही बोलत आहोत सारा अली खानची आई अमृता सिंहबद्दल. 

3/10

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अमृता सिंह हिचं भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी साखरपुडा झाला होता. पण हे नातं लग्नापर्यंत पोहोचल नाही. 

4/10

अमृता सिंह आणि सनी देओल या दोघांच्या नात्याचीही खूप चर्चा झाली होती. ते दोघे अनेक दिवस एकमेकांना डेट करत होते असं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं जातं. 

5/10

अमृता आणि विनोद खन्नाची लव्ह स्टोरीही खूप चर्चेत होते. विनोद खन्नाला बटवारा चित्रपटाच्या सेटवर पाहता क्षणी ती प्रेमात पडली. असं म्हणतात विनोद खन्नामुळेच तिचा रवी शास्त्रीसोबत साखरपुडा मोडला. 

6/10

विनोद खन्ना आणि अमृता सिंह यांच्या वयात 12 वर्षांचा फरक असूनही, दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे होते असं म्हणायचे. एवढंच नाही तर अशी अफवा पण पसरली होती की ते दोघे लग्न करणार होते. 

7/10

पण अमृता विनोद खन्नाच्या आयुष्यात आली तेव्हा अभिनेत्याच लग्न झालं होतं. पण काही वेळानंतर गितांजलीसोबत विनोद यांचं लग्न संपुष्टात आलं. आता अमृतासोबत लग्न करणं सोप होतं तरीदेखील हे लग्न होऊ शकलं नाही. 

8/10

अमृता आणि विनोद यांच्या नात्याबद्दल अमृता यांची आई रुखसाना सुल्ताना यांना आक्षेप होता. त्या दोघांमधील वयाचं अंतर, पहिला बायकोपासून घटस्फोट हे मुद्द तर होतेच. शिवाय रिपोर्ट्सनुसार विनोद खन्ना यांचा धर्म.

9/10

अमृता यांच्या आईला लेकीसाठी हुशार मुस्लिम मुलगा हवा होता. ती हिंदू मुलाशी लग्न करणार म्हणून त्यांनी विरोध केला होता. शेवटी या दोघांना आपलं नात्याला ब्रेक लावावा लागला. 

10/10

पुढे अमृता सिंह हिने 12 वर्ष लहान अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. जे काही काळानंतर संपुष्टात आलं. तर विनोद खन्ना यांच्या आयुष्यात कविता दफ्तरीचं एन्ट्री झाली.