छत नसलेले महाराष्ट्रातील एकमेव मंदिर; वास्तुकलेचा आश्चर्यकारक नमुना

अमरावतीमध्ये एक अत्यंत प्राचीन मंदिर आहे. या मंदिराला कळस किंवा छत नाही. 

| Oct 31, 2024, 23:33 PM IST

Amravati Anandeshwar Mahadev Temple : अमरावती जिल्ह्यात एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. या मंदिराला छत नाही. कळस किंवा छत नसलेले हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. हे मंदिर स्थापत्य शैलीचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे.

1/7

महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरे आहे. प्रत्येक मंदिराला कळस किंवा छत असतेच. मात्र, एक मंदिर असे ज्याला कळस नाही.    

2/7

उत्तरमुखी मंदिराचा आकार अष्टकोनी आहे. तर मंदिराचा दक्षिण भाग हा चिरेबंदी दगडी भिंतीने बंद आहे. मंदिराच्या पूर्व-पश्चिम व उत्तर दिशेला खिडक्या व दरवाजे आहेत. दर्शनी भागाकडून या वास्तूकडे बघितल्यास एखाद्या भल्यामोठ्या रथाला हत्ती जुंपल्याचा भास होतो. 

3/7

मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडीपाड्या एकावर एक रचून करण्यात आले आहे. प्रत्येक दगडावर कोरीव काम करण्यात आले आहे.   

4/7

आनंदेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर आहे. बाराव्या शतकात हे मंदिर बांधले गेले.  हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. 

5/7

आनंदेश्वर मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला छत नाही.  गाभाऱ्यात लख्ख प्रकाश यावा यासाठी हे असंच खुलं ठेवण्यात आल असावं असं अभ्यासक सांगतात.

6/7

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात येणारे लासुर येथे आनंदेश्वर अर्थात महादेव मंदिर ( Anandeshwar Mahadev Temple Amravati ) आहे.   

7/7

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात एका छोट्याशा गावात असलेले हे मंदिर वास्तुकलेचा आश्चर्यकारक नमुना ठरले आहे.