Paris Olympics 2024 : अमन सेहरावतची सेमीफायनलमध्ये धडक, कुस्तीतून भारताला पदकाची अपेक्षा

Aman sehrawat into the semis : भारतीय कुस्तीपटू अमर सेहरावतने 57 किलो वजनी गटाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता त्याला पदक निश्चित करण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. 

| Aug 08, 2024, 17:05 PM IST
1/5

पदकाच्या आशा पुन्हा जिवंत

भारताचा कुस्तीपटू अमर सेहरावतने क्वार्टर फायनल सामन्यात  उत्तर मॅसेडोनियाच्या व्लादिमीर एगोरोव्हचा दारूण पराभव केला. त्यामुळे आता भारताच्या पदकाच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत. 

2/5

अमन सेहरावत

अमन सेहरावतने 57 किलो फ्री स्टाईल प्रकारात अल्बेनियाच्या झेलीमखान अबाकारोवचा 12-0 असा पराभव करून तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर सेमीफायनल गाठली.

3/5

सेमीफायनल सामना

अमन सेहरावतच्या या कामगिरीमुळे आता भारताला आणखी एक पदक मिळणार का? असा सवाल विचारला जातोय. अमन सेहरावत याचा सेमीफायनल सामना आज रात्री 9:45 ला खेळवला जाईल. 

4/5

भारताचं पदक निश्चित

सेमीफायनल सामना जर अमन सेहरावतने जिंकला तर भारताचं पदक निश्चित होईल आणि सुवर्णपदकासाठी भारताच्या आशा जागृत राहू शकतात.

5/5

कुस्तीमध्ये सात पदके

दरम्यान, ऑलिम्पिकपासून कुस्तीपटू या खेळात देशासाठी सातत्याने पदके जिंकत आहेत. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये सात पदके जिंकली आहेत. त्यामुळे आणखी एक पदक भारताच्या खात्यात येणार, अशी शक्यता दिसतीये.