खास मैत्रिणीच्या लग्नात आलियाचा जलवा
मैत्रिणीच्या लग्नात आलिया ऐथनिक जलवा
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या 'गली बॉय' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. 'गली बॉय'ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. 'गली बॉय'मधील रणवीर सिंह आणि आलिया भट्टच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. आलिया सध्या तिच्या बेस्ट फ्रेन्डच्या लग्नात धमाल करताना दिसत आहे. तिच्या मैत्रिणीच्या लग्नातील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये आलियाचा ऐथनिक जलवा पाहायला मिळत आहे.