...अन् 'गृह'मंत्र्यांपुढे अजित पवार लाजले! वाढदिवशी स्वत:च फोटो शेअर करत म्हणाले...

Ajit Pawar Birthday : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या राजकीय वर्तुळामध्ये रुची ठेवणाऱ्या अनेकांच्याच आवडीचे.   

Jul 22, 2024, 12:18 PM IST

Ajit Pawar Birthday : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये बंड करत आपली वेगळी फळी आणि राज्याच्या राजकारणात वेगळं अस्तित्वं निर्माण करणारं एक नाव म्हणजे अजित पवार. 

 

1/7

राजकारण

Ajit pawar birthday deputy cm gets best wish from wife mp sunetra pwar shares photo

राजकारणात प्रचंड दबदबा असणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील मानाच्या कुटुंबातील सदस्य असणाऱ्या अजित पवार यांचा आज (22 जुलै 2024) वाढदिवस.   

2/7

शुभेच्छा

Ajit pawar birthday deputy cm gets best wish from wife mp sunetra pwar shares photo

अजित पवारांना सध्या समर्थक आणि राजकीय वर्तुळातील त्यांच्या मोठ्या मित्रपरिवाराकडून या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.   

3/7

मन जिंकलं

Ajit pawar birthday deputy cm gets best wish from wife mp sunetra pwar shares photo

इथं सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच तिथं अजित पवार यांचं मन मात्र एका खास शुभेच्छेनं जिंकलं आहे. ही शुभेच्छा कोणाची आहे माहितीये?   

4/7

Ajit pawar birthday deputy cm gets best wish from wife mp sunetra pwar shares photo

ही शुभेच्छा आहे अजित पवार यांची पत्नी, खासदार सुनेत्रा पवार यांची. 'मी राज्याचा गाडा हाकत असताना आयुष्यभर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेल्या माझ्या अर्धांगिनी ने गुलाबाचे फुल देऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या', असं कॅप्शन लिहित अजितदादांनी या सुरेख फोटो सोशल मीडियावर शेअर केला.   

5/7

Ajit pawar birthday deputy cm gets best wish from wife mp sunetra pwar shares photo

राजकारणाच्या या जगतामध्ये अजित पवारांचं हे रुप, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि स्मितहास्य पाहून यावेळी त्यांनी खऱ्या अर्थानं राजकारणाव्यतिरिक्त एखाद्या कारणानं सर्वांची मनं जिंकली.   

6/7

आपुलकी

Ajit pawar birthday deputy cm gets best wish from wife mp sunetra pwar shares photo

पवार कुटुंबाविषयी कायमच अनेकांनाच आपुलकी आणि आदर वाटत आला आहे. शरद पवार, अजित पवार असो किंवा मग त्यांच्या कुटुंबातील इतर कोणी व्यक्ती असो... सोशल मीडियावर या कुटुंबाचे फोटो कायमच चर्चेचा विषय ठरतात.   

7/7

बाजी मारली

Ajit pawar birthday deputy cm gets best wish from wife mp sunetra pwar shares photo

यावेळी मात्र अजित पवारांनीच बाजी मारली असून, त्यांच्या फोटोला सोशल मीडियावर कमाल पसंती मिळताना दिसत आहे.