मित्र निवडताना काळजी घ्या, चुकीचा निवडलात तर वाटोळं झालंच म्हणून समजा - अजित पवार

Ajit Pawar : रविवारी अजित पवार हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते अंबड येथील विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा पार पडला.

Mar 26, 2023, 13:42 PM IST

Ajit Pawar : मित्र मैत्रिणी निवडताना काळजी घ्या, वाईट मित्र भेटले की आयुष्याचं वाटोळं होतं, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

1/6

ajit pawar on WhatsApp University

व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हरसिटीने गेल्या सात ते आठ वर्षात अंधभक्तांची फौज तयार केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप आलेल्या माहितीची शाहनिशा न करता ती फॉरवर्ड करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. या सगळ्यांनी समाजात देशात अनेक गैरसमज पसरवले आहेत. त्यामुळे समाजाचे होणारे नुकसान प्रचंड मोठे आहे. 

2/6

ajit pawar sharad pawar

जे बुद्धीला पटेल त्यावरच विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी पुढे गेले पाहिजे. त्यासाठी संवाद अतिशय महत्त्वाचा आहे. कुठलाही संवाद मन की बात सारखा असू नये. जन की बात ऐकण्याची पण सवय आपण लावली पाहिजे.

3/6

ajit pawar to student

राजकारणात, समाजकारणात, उद्योग क्षेत्रात काय घडतंय याची माहिती विद्यार्थ्यांना असली पाहिजे. त्यातून उद्याचा सूजाण नागरिक घडणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.

4/6

ajit pawar on IT job

अलीकडे आयटीमध्ये नोकरी लागली तर कंपनी कधी काढून टाकेल सांगता येत नाही. नोकरी लागली आणि पाच लाखांचे पॅकेज मिळाले तर सगळ्या अडचणी संपल्याचे कारण नाही. त्याच्यातून बचत करत चला, असेही अजित पवार म्हणाले.

5/6

ajit pawar career

अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही करिअर करु शकता. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देखील आहेत. कृपा करुन कुणी काहीही सांगितले तरी तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे तेच करिअर निवडावे. त्यालाच प्राधान्य द्यावे. अलीकडे विद्यार्थ्यांचा कल शेतीकडेही वाढला आहे ही चांगली बाब आहे. अत्याधुनिक पद्धतीने शेती केली की ते  ही पिकते.

6/6

Ajit Pawar advises students

मित्र मैत्रिणी निवडताना काळजी घ्या. नाहीतर तुम्ही कितीही चांगलं काम करायला लागलात आणि मित्र, मैत्रिणी चुकीचे असले तर तुमचं वाटोळं झालंच म्हणून समजा. मित्र मैत्रिणींचे जीवनात खूप महत्त्व असते. त्यामुळे ते निवडताना काळजी घ्या असा सल्ला अजित पवार यांनी दिला.