फॅशन नाही 'या' कारणामुळं ऐश्वर्या राय उजव्या हातात घालते V आकाराची अंगठी; कोब्रा सापाशी कनेक्शन

Aishwarya Rai V Shape Ring: तुम्ही ऐश्वर्याच्या सोशल मीडियावरील फोटोंकडे निरखून पाहिलं तर ती उजव्या हाताच्या बोटामध्ये इंग्रजीमधील व्ही V आकाराची अंगठी घालते. ही अंगठी घालण्यामागे खास कारण आहे. त्याचसंदर्भात जाणून घेऊयात...  

| Jul 27, 2024, 13:36 PM IST
1/12

Aishwarya Rai V Shape Ring

मागील अनेक वर्षांपासूनच ऐश्वर्याचे फोटो पाहिले तर तिच्या उजव्या हाताच्या बोटामध्ये व्ही आकाराची अंगठी दिसून येते. ही अंगठी ती केवळ फॅशन म्हणून घालत नाही. यामागे एक फारच विशेष कारण आहे. याच कारणाबद्दल...

2/12

Aishwarya Rai V Shape Ring

सध्या घटस्फोटाच्या कथित चर्चांमुळे सोशल मीडियावरील ट्रेण्डींग टॉपिकमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचं नाव अनेकदा दिसतं. खरं तर ऐश्वर्या ही तिच्या सौंदर्याबरोबरच स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. ऐश्वर्याने मागील अनेक दशकांपासून चित्रपट चाहत्यांना आपल्या सौंदर्याने भुरळ पाडली आहे.

3/12

Aishwarya Rai V Shape Ring

तुम्ही ऐश्वर्याच्या सोशल मीडियावरील फोटोंकडे निरखून पाहिलं तर ती उजव्या हाताच्या बोटामध्ये इंग्रजीमधील व्ही V आकाराची अंगठी घालते. ही अंगठी साधीसुधी नसून फारच खास आहे. ही अंगठी घालण्यामागे एक खास कारण आहे. त्याचसंदर्भात जाणून घेऊयात...

4/12

Aishwarya Rai V Shape Ring

ऐश्वर्या उजव्या हातात जी अंगठी V आकाराची घालते त्याला वाडुंगीला किंवा वानकी असं म्हणतात. कर्नाटकमधील विवाहित महिलांमध्ये अशी अंगठी घालण्याची प्रद्धत प्रचलित आहे. खास करुन तुलू महिला अशा अंगठ्या वापरतात.

5/12

Aishwarya Rai V Shape Ring

कर्नाटकमधील दक्षिण कानडा आणि उडप्पी जिल्हामध्ये तसेच कासगोडा जिल्ह्याच्या उत्तरेपासून अगदी केरळमधील चंद्रगिरी नदीपर्यंतच्या भागातील विवाहित महिला ऐश्वर्या घालते तशी V आकाराची अंगठी घालतात. या संपूर्ण भागाला तुलू नाडू असं म्हणतात. 

6/12

Aishwarya Rai V Shape Ring

या V आकारच्या अंगठीचा कोब्रा सापाशी संबंध जोडला जातो. या भागामध्ये कोब्रा हा फार पवित्र मानला जातो. तुलू नाडूमध्ये येणाऱ्या प्रांतात कोब्राची पूजा केली जाते. या ठिकाणी सापांसाठी विशेष जंगलं राखीव असतात त्याला कोब्राबन असं म्हटलं जातं. कोब्रा जेव्हा फणा काढतो तेव्हा त्याच्या माथ्यावर V आकाराचं चिन्ह दिसतं. कोब्राच्या माथ्यावरील हे V चिन्ह चांगलं नशीब, संपत्ती आणि यशाचं प्रतिक मानलं जातं. हेच या अंगठी मागील कनेक्शन आहे.

7/12

Aishwarya Rai V Shape Ring

भारतामधील वेगवेगळ्या भागांमध्ये तेथील स्थानिक प्रथांप्रमाणे विवाहित महिला वेगवेगळे दागिणे परिधान करतात. यापैकी मंगळसूत्र हा सर्वाधिक वापरला जाणारा दागिणा म्हणता येईल. तशीच तुलू नाडूमध्ये ही V आकाराची अंगठी आहे. या अंगठीमुळे नशीब उजाळतं, भरभराट होते असं मानलं जातं.

8/12

Aishwarya Rai V Shape Ring

धीरज शेट्टी मिजार नावाचा कंटेट क्रिएटर वेगवेगळ्या संकल्पनांसंदर्भातील व्हिडीओ बनवतो. त्याने एका व्हिडीओमध्ये ऐश्वर्या परिधान करते तशा अंगठ्या घालण्यासंदर्भातील कर्नाटकमधील परंपरेबद्दल सांगताना, "व्ही आणि यू आकाराच्या अंगठ्या वेगवेगळ्या भागातील लोक वेगवेगळ्या कारणासाठी परिधान करतात. यासंदर्भात मी अनेकांशी बोललो आहे. अनेक ठिकाणी वाचलं आहे," असं म्हटलं होतं

9/12

Aishwarya Rai V Shape Ring

"तुलू नाडूमधील महिला लग्नानंतर अशी अंगठी घालतात. तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील महिला लग्नाआधी आणि लग्नानंतरही अशा अंगठ्या वापरतात. या अंगठ्यांना वेगवेगळी नावं आहेत," असं धीरज शेट्टी मिराजने सांगितलं. ऐश्वर्याने ही अंगठी घालण्यामागे हेच कारण आहे.

10/12

Aishwarya Rai V Shape Ring

ऐश्वर्या जी व्ही आकाराची अंगठी घालते त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. "अंजी, वानकी, ओंकी उन्नगरा, अंजूनग्रामा अशी या अंगठ्यांना नावं आहेत. या सर्व अंगठ्या परिधान करण्यामागील कारण एकच आहे ते म्हणजे आपल्याला सुख, शांती, समाधान आणि भरभराट लाभो," असंही धीरज शेट्टी मिजार सांगतो.

11/12

Aishwarya Rai V Shape Ring

ऐश्वर्या ही मूळची कर्नाटकमधील बुंट समाजामधील आहे. त्यामुळेच ती इतर महिलांप्रमाणे वाडुंगीला परिधान करते. बुंट समाजामध्ये विवाहित महिला या अंगठ्या वापरतात. या समाजामध्ये अशीही मान्यता आहे की अशी अंगठी परिधान केल्यास विवाहित महिलेला दृष्ट लागत नाही.

12/12

Aishwarya Rai V Shape Ring

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)