रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? 'या' चार खेळाडूंची नावं चर्चेत

Who is After Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma retirement) वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.

Saurabh Talekar | Jun 30, 2024, 16:58 PM IST
1/6

रोहित म्हणतो...

फॉरमॅटला निरोप देण्याची उत्तम वेळ आहे. मला यातील प्रत्येक क्षण आवडला. हा माझा शेवटचा खेळही होता आणि मला हेच हवं होतं की मला वर्ल्ड कप जिंकायचा होता, असं रोहित म्हणतो.

2/6

टीम इंडियाचा कॅप्टन

रोहित शर्माने टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता टीम इंडियाचा आगामी कॅप्टन कोण असणार? असा सवाल विचारला जातोय. 

3/6

हार्दिक पांड्या

रोहित शर्मानंतर निवृत्तीनंतर आता मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याचं नाव चर्चेत आहे. हार्दिक पांड्याचं नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. टी20 विश्वचषक आधी पांड्या भारतीय संघाचा उपकर्णधार होता. 

4/6

जसप्रीत बुमराह

बीसीसीआयने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधी जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर टी-ट्वेंटी संघाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे आता बुमराहचं नाव देखील चर्चेत आहे.

5/6

ऋषभ पंत

टी-ट्वेंटीचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत याचं नाव देखील चर्चेत आहे. आयपीएलमध्ये गेल्या 2 हंगामांपासून दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करतोय. त्यामुळे ऋषभचा अनुभव पाहता, त्याला देखील संघ नेतृत्वाची संधी दिली जाऊ शकते.

6/6

सूर्यकुमार यादव

टीम इंडियाचा स्टार टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादव याच्यावर देखील कॅप्टन्सीची जबाबदारी दिली जाऊ शकते. सूर्याकडे अनुभव नसला तरी देखील त्याच्यावर बीसीसीआय विश्वास ठेऊ शकते.