Zoom Call, दौरा अन्...; प्रभासलाच रामाच्या भूमिकेसाठी का निवडलं? ओम राऊतांनी सांगितलं स्पेशल कारण
Adipurush Director Om Raut On Why He Chose Prabhas: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटावरुन अनेक वाद निर्माण झाले आहेत. अनेकांनी रामायणाच्या मूळ कथेशी केलेली छेडछाड, पात्रांमधील बदल यासारख्या गोष्टींवरुन टीका केलेली असतानाच कलाकारांची निवड चुकल्याचीही टीका केली जात आहे. रामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासची निवड चुकल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. मात्र प्रभासची निवड या भूमिकेसाठी करण्यामागील कारण आणि प्रभासला पहिल्यांदा हे सांगितलं तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती याबद्दल दिग्दर्शकांनीच खुलासा केला आहे. काय घडलं या निवडप्रक्रियेदरम्यान पाहूयात...
1/11
2/11
मात्र ओम राऊत यांच्या या पहिल्याच प्रयत्नाला नकारात्मक रिव्ह्यू मिळत असून चित्रपटावरुन अनेक वादांना तोंड फुटलं आहे. एकीकडे या चित्रपटावर टीका होत असली तरी चित्रपटाची कमाईच्याबाबतीत उत्तम घौडदौड सुरु आहे. चित्रपटाने प्रदर्शनानंतर 2 दिवसांमध्येच जागतिक स्तरावर 200 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. नकारात्मक रिव्ह्यूजचा पाऊस पडत असतानाही या चित्रपटाने सोमवारी (18 जून 2023 रोजी) भारतामध्ये 64 कोटींची कमाई केल्याचं स्पष्ट झालं आहे. ही आकडेवारी पाहून राऊत यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
3/11
या चित्रपटामधील पात्र, संवादांवर आक्षेप घेतानाच रामायणाच्या मूळ कथानकाची मोडतोड करण्यात आल्याची टीका होत आहे. कलाकारांची निवडही चुकल्याचं काहींनी म्हटलं आहे. खास करुन रामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासच्या पात्रासाठी मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला असला तरी त्याच्या चेहऱ्यावर फारसे हावभाव दिसत नसल्याची टीका होत आहे. मात्र प्रभासची रामाच्या भूमिकेसाठी निवड का केली याबद्दल ओम राऊत यांनी खुलासा केला आहे.
4/11
रामायणावर आधारीत 'आदिपुरुष' चित्रपटामध्ये प्रभासने राघवची भूमिका साकारली असून अभिनेत्री क्रिती सेनॉनने जानकीची भूमिका साकारली आहे. सैफ अली खानने रावणाची तर 'खंडोबा'फेम देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कास्टींग करताना प्रभास हाच पहिली पसंती होता का असा प्रश्न ओम राऊत यांना विचारण्यात आला.
5/11
6/11
"संपूर्ण रामायण एकाच वेळी मोठ्या पडद्यावर दाखवणं कठीण आहे. मात्र तुम्ही संपूर्ण श्रद्धा ठेऊन आणि समजून घेत ते मांडण्याचा प्रयत्न करु शकता. मी रामायणातील केवळ एकाच भागावर लक्ष केंद्रीत केलं आहे, तो भाग म्हणजे पराक्रमी राम, परमवीर, राजाराम आणि युद्धखंड हा होय. आपण युद्धखंडामध्ये रामामधील अनेक गुणविशेषणं पाहू शकतो. मात्र यामध्ये परमवीर हा गुणधर्म प्राकर्षाने जाणवतो. मी स्वत: याचमुळे या कथानकाकडे खोचलो गेलो. मी केवळ मला जे जाणवलं ते मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला," असं ओम राऊत प्रभास आणि क्रितीची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाबद्दल म्हणाले.
7/11
"प्रभासच या भूमिकेसाठी योग्य होता कारण तो मनाने फार चांगला आहे. आपल्या मनाचं प्रतिबिंब आपल्या डोळ्यांमध्ये दिसतं. तुम्हाला प्रभासच्या डोळ्यांमध्येच प्रमाणिकपणा दिसतो. तो फार मोठा स्टार आहे पण तो फार साधा आहे. त्यामुळेच मी जेव्हा चित्रपट बनवण्याचा विचार केला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर त्याचाच चेहरा होता," असं ओम राऊत यांनी सांगितलं.
8/11
मात्र 'आदिपुरुष'मधील या भूमिकेसाठी तूच योग्य असल्याचं प्रभासला पटवून देणं फारच कठीण होतं असंही ओम राऊत यांनी सांगितलं. "खरं सांगायचं तर त्याला हे पटवून देणं कठीण होतं. आपण सगळेजण अडकून होतो त्या कोरोना साथीच्या काळात मी त्याच्याशी फोनवरुन चर्चा केली. ती चर्चा साधारण अशी होती... मी कोणती भूमिका करावी असं तुला वाटतंय? असं त्याने मला कॉलवर विचारलं असता मी त्याला तू खरोखर हे विचारतोयस का? असा प्रतीप्रश्न केला," अशी माहिती ओम राऊत यांनी दिली.
9/11
"तू प्रभू श्री रामाची भूमिका साकारावी असं मला वाटत असल्याचं प्रभासला सांगितलं. त्यावर त्याने मला ही भूमिका मी साकारावी याबद्दल तुला खात्री आहे ना? असा प्रश्न विचारला. त्यावर मी, हो असं उत्तर दिल्यानंतर नेमकं कसं हे होणार याबद्दल त्याने विचारलं. एवढ्या मोठ्या कलाकाराला झूम कॉलवर चित्रपट समजावून सांगणं फार कठीण होतं," असं ओम राऊत म्हणाले.
10/11
"नशीबाने मला एक वैमानिक मिळाला ज्याने मला मुंबईहून हैदराबादला नेलं आण त्याच दिवशी तो मला परत घेऊन आला. मी हैदराबादला गेलो. मी त्याला चित्रपटाबद्दल सर्व काही तोंडी सांगितलं तेव्हा तो लगेच हो म्हणाला. तो या चित्रपटाबद्दल फार एक्सायटेड होता. मला कायचम पाठींबा देणाऱ्यांपैकी तो एक आहे. मला ज्या पद्धतीने दिग्दर्शन करायचं होतं त्याला त्याचा पाठिंबा होता. देवाच्या कृपेने तो कायम माझ्या पाठीशी उबा होता. तो भविष्यातही माझ्या पाठीशी असेल अशी खात्री आहे," असं ओम राऊत म्हणाले.
11/11