Rahul Gandhi Birthday : राहुल गांधी यांचं नाव बदलून Raoul Vinci का ठेवण्यात आलं होतं? पाहा खास Photo

Happy Birthday Rahul Gandh : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 53 वा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पक्षातील सर्वच नेते खास भेटायला जातं आहे. राहुल गांधी यांचं अजून एक नाव होतं तुम्हाला माहिती आहे का?

Jun 19, 2023, 11:33 AM IST

Happy Birthday Rahul Gandh : राहुल गांधी काँग्रेसचे नेते, भारताच्या पहिल्या महिला इंदिरा गांधी आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे  नातू...राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे पुत्र...त्यांचा जन्मानंतर आईच्या छत्रछायेत वाढणारे राहुल गांधी त्यावेळी कधीच मीडियासमोर आले नव्हते. अविवाहित असलेले राहुल गांधींचं नाव एकेकाळी Raoul Vinci असं होतं. 

1/13

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जन्म  19 जून 1970 रोजी दिल्लीत झाला. 

2/13

राजकीय घराण्यात जन्माल्यामुळे लहानपणापासूनच राजकारणाचे धडे त्यांना मिळाले. राहुल गांधी हे लहानपणापासूनच वडील राजीव गांधी आणि आजी इंदिरा गांधी यांच्या खूप जवळ होते.   

3/13

आजी आणि वडिलांसोबत त्यांची साथ खूप कमी काळाची होती. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी इंदिरा गांधी यांना गमावलं. आजीच्या हत्येनंतर 21 मे 1991 रोजी वडील राजीव गांधी यांची हत्या झाली आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलं. 

4/13

दिल्लीतील मॉडर्न स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर राहुल गांधी डेहराडूनमधील दून स्कूलमध्ये गेले. यानंतर, 1989 मध्ये त्यांनी दिल्लीमधील सेंट स्टीफन्स कॉलेज प्रवेश घेतला.  

5/13

मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. पण सुरक्षेच्या कारणास्तव राहुल यांना 1991 मध्ये हार्वर्ड विद्यापीठ सोडावं लागलं.   

6/13

राजीव गांधींची हत्या झाली त्यामुळे त्यांना अमेरिकेतील फ्लोरिडामधील रोलिन्स कॉलेजमध्ये हलवण्यात आले.

7/13

याच वेळी राहुल गांधी यांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी त्यांचं नाव Raoul Vinci ठेवण्यात आलं होतं. 

8/13

त्यांनी 1994 मध्ये कला शाखेतून पदवी संपादन केली. त्यानंतर 1995 मध्ये ट्रिनिटी कॉलेज केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी एमफिल पदवी मिळवली. 

9/13

वडील राजीव गांधी यांच्या उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून 2004 मध्ये त्यांनी दणदणीत विजय मिळवला. अशी सुरुवात झाली राहुल गांधी यांच्या राजकीय प्रवासाला.  

10/13

त्यानंतर त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे त्यांच्याकडे नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया आणि भारतीय युवक काँग्रेसचीही जबाबदारी देण्यात आली. 

11/13

डिसेंबर 2017 मध्ये त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.   

12/13

मात्र 3 जुलै 2019 ला राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पराभवाची जबाबदारी स्विकारत अधिकृतपणे काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.  

13/13

राहुल गांधी आजही अविवाहित आहेत. मी काँग्रेस पक्षाशी लग्न केलं आहे, असं ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असतात. पण त्यांचा एका नेपाळी तरुणीसोबतचा पबमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.