तुम्ही आधारसोबत पॅनकार्ड लिंक केलं? 'ही' आहे शेवटची संधी

तुम्ही अजूनही आधारकार्ड तुमच्या पॅनकार्डसोबत लिंक केलं नसेल आजच घरबसल्या करा.

Feb 28, 2021, 19:51 PM IST
1/6

आधार पॅनकार्डसोबत आजच करा लिंक

आधार पॅनकार्डसोबत आजच करा लिंक

प्रत्येक कामसाठी आजकाल आधारकार्ड असणं खूप आवश्यक आहे. त्याच बरोबर आधारशी पॅन लिंक असणे तितकेच गरजेचं आहे. तुम्ही अजूनही आधार आणि पॅनकार्ड एकमेकांशी लिंक केलं नसेल तर तुमच्यासाठी एक शेवटची संधी देण्यात आली आहे.

2/6

आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची संधी

आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची संधी

आधार पॅनकार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. त्यामुळे जर तुम्ही केलं नसेल तर आजच करून घ्या. ही शेवटची संधी देण्यात आली आहे. आता कोरोनामुळे बाहेर जाण्याची देखील आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या आधारकार्डसोबत पॅनकार्ड लिंक करू शकता.   

3/6

घरबसल्या आधार कार्ड पॅनसोबत लिंक कसं करायचं?

घरबसल्या आधार कार्ड पॅनसोबत लिंक कसं करायचं?

तुम्ही आजुनही आधारकार्डशी पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही. त्यामुळे आता घरी बसल्याच हे शक्य होणार आहे. आधारकार्डशी पॅनकार्ड लिंक करण्याचे हे आहेत दोन पर्याय.

4/6

वेबसाईटवरून कसं करायचं लिंक

वेबसाईटवरून कसं करायचं लिंक

पहिल्या पर्यायमध्ये आपल्याला आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in  या संकेत स्थळावर जावं लागेल. संकेतस्थळावर गेल्यानंतर तुमचा आधार, पॅन नंबर टाकून तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता दिलेली माहिती भरा. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक होईल. माहिती अचूक असेल तर पॅनकार्ड आधारशी लिंक झाल्याचा SMS तुम्हाला येईल.

5/6

SMS द्वारे करता येईल लिंक

SMS द्वारे करता येईल लिंक

दुसऱ्या पर्यायात तुम्हाला UIDPAN लिहून स्पेस द्या, त्यानंतर तुमचा आधार नंबर टाका, स्पेस द्या त्यानंतर पॅनकार्ड नंबर टाका आणि ५६७६७८ या नंबरवर किंवा ५६१६१ नंबरवर मेसेज करा. ह्या दोन्ही नंबर पैकी एका नंबरवर SMS करता येईल.

6/6

तर आधार होऊ शकते बंद

तर आधार होऊ शकते बंद

जर आपण 31 मार्च 2021 पर्यंत आपले आधार पॅनकार्डसोबत लिंक केलं नाही तर आपलं आधारकार्ड बंद होऊ शकतं. एवढंच नाही तर आपल्याला बंद झालेलं आधारकार्ड पुन्हा चालू करण्यासाठी मोठा दंड भरावा लागू शकतो असंही सांगितलं जात आहे.