Childrens Diet : स्मार्ट, तल्लख बुद्धीसाठी मुलांना काय खाऊ घालाल? 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर

Sharp Brain in Babies : प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींमध्ये ही हुशार असावे असं वाटतं. जर बाळाला तल्लख बुद्धी हवी असेल तर  त्यांना जीवनसत्व असलेले सकस अन्न नियमितपणे त्यांना देत जा. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, नेमकं मुलांना कोणते पदार्थ दिले पाहिजेते जाणून घ्या... 

Mar 22, 2024, 15:53 PM IST
1/7

अनेकद लहान मुलांना घरच्या जेवणापेक्षा प्रक्रिय केलेल बाहेरचे पदार्थ जास्त आवडतात. मात्र यामुळे त्यांना कालांतराने आरोग्याच्या समस्या भेडसवण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक पालक विविध पदार्थांच्या वेगळ्या रेसिपी देऊन मुलांना पौष्टिक आहार देत असतात. 

2/7

भाजीपाला

भाजीपाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे असतात. जी मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी मदत करीत असतात. त्यामुळे मुलांना मुबलक प्रमाणात भाजीपाला खाण्याची सवय लावणे गरजेचे असते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. जे आरोग्यासाठी उत्तम आहे. 

3/7

बिया

मुलांच्या मेंदूच्या विकासाठी बिया अतिशय महत्त्वाचे असतात. यामध्ये अॅसिडचे तत्त्व असते. फार कमी भाज्यांमध्ये आढळते. त्यामुळे तेलबिया शरीरासाठी फायदेशीर असतात. साजूक तूपसुद्धा शरीरासाठी चांगले असते. 

4/7

नट्स आणि ड्रायफ्रूट

नट्स आणि ड्रायफ्रूटमध्ये ओमेगा असते. त्यामुळे मुलाच्या बौद्धिक विकासास मदत होते. कॅल्शियम आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. जी वाढीसाठी गरजेची असतात. 

5/7

फळे

मुलांना ज्या पद्धतीचा सीझन असेल त्यावेळीची फळे नियमित खाण्यास देणे गरजेचे आहे. यामधून मुलांना विविध प्रकारची खनिजे मिळू शकतात. त्यामुळे मुलांना याचा फायदा होऊ शकतात. विशेष म्हणजे मुलांना फळाचा ज्यूस न करुन देता ती आहे तशीच स्वच्छ करुन किंवा कापून खायला द्यावीत. 

6/7

डार्क चॉकलेट

चॉकलेट खाल्ल्याने मुलांचा मूड चांगला राहण्यास मदत होते. मात्र त्याचे प्रमाण अति होता कामा नये. अन्यथा वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. काण त्यामध्ये साखर आणि चरबीचे प्रमाण अधिक असते. 

7/7

दही

दही खाल्ल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे दिवसभर मूल आनंदी राहते. त्याचा मानसिक आरोग्यासाठी चांगला फायदा होतो.