PHOTO : Adah Sharma नं आईला मराठीत दिल्या 'मदर्स डे'च्या खास शुभेच्छा

Adah Sharma Mother's Day Marathi Post : आज मदर्स डे त्यानिमित्तानं प्रत्येक व्यक्ती आपल्या आईला शुभेच्छा देताना दिसते. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच पोस्ट शेअर करत त्यांच्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात ‘द केरला स्टोरी’ चित्रपट फेम अभिनेत्री अदा शर्मानं सोशल मीडियावर तिच्या रिल आणि रियल आई आणि आजीसोबतचे फोटो शेअर करत सगळ्यांना मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिनं सगळ्यांचे द केरला स्टोरीला दिलेल्या प्रेमासाठी आभारही मानले आहेत. यावेळी सगळ्यांचे लक्ष तिनं केलेल्या मराठी कॅप्शननं वेधले आहे. 

| May 14, 2023, 18:10 PM IST
1/7

मदर्स डे निमित्तानं शेअर केले हे फोटो

adah sharma mother s day

अदा शर्मानं मदर्स डेच्या निमित्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

2/7

रिल लाईफ आणि रिअर लाइफ आईचे फोटो

adah sharma mother s day

अदा शर्मानं मदर्स डे च्या निमित्तानं तिच्या रिअर लाइफ आणि रिल लाईफच्या आईचे दोघांचे फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत त्यांना मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

3/7

मानले प्रेक्षकांचे आभार

adah sharma mother s day

मदर्स डे च्या निमित्तानं ही पोस्ट शेअर करत प्रेक्षकांनी द केरला स्टोरी या चित्रपटाला दिलेल्या प्रेमासाठी आणि केलेल्या कौतुकासाठी अदानं आभार मानले आहे. 

4/7

मराठीत कॅप्शन देत म्हणाली...

adah sharma mother s day

धन्यवाद! माझा ‘मदर्स डे’ इतका स्पेशल बनवल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार… असे कॅप्शन अदानं मराठीत त्या पोस्टला दिले आहे. 

5/7

आजी सगळ्यांना देत ही खास भेट

adah sharma mother s day

पुढे तिची आजी सगळ्यांना व्हर्च्युअल डोसा आणि पायसम पाठवत आहे असं अदा म्हणाली.

6/7

'द केरला स्टोरी'नं केला 100 कोटींचा आकडा पार

adah sharma mother s day

द केरला स्टोरी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 112.90 कोटींचा गल्ला 9 दिवसात केला आहे.  

7/7

मराठी कवितांचे व्हिडीओ झाले व्हायरल

adah sharma mother s day

अदानं बालपणीच्या मराठी कविता गात काही व्हिडीओ शेअर केले होते हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. (All Photo Credit : Adah Sharma Instagram)