16 व्या वर्षी चित्रपटात डेब्यू, 3 चित्रपटांपैकी 2 चित्रपटांनी केली 3000 कोटींची कमाई, कोण आहे ती अभिनेत्री?

बॉलिवूडमधील या अभिनेत्रीने 4 वर्षाच्या करिअरमध्ये तीन केले. त्यामधील 2 चित्रपटांनी जगभारत 3000 कोटींची कमाई केली. 

| Oct 23, 2024, 12:38 PM IST
1/7

24 वा वाढदिवस

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांनी काम केलं आहे. काही कलाकारांनी इंडस्ट्रीमध्ये जास्त दिवस काम केले तर काहींनी कमी कालावधीमध्ये इंडस्ट्री सोडली. 

2/7

जायरा वसीम

अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. जिचे नाव जायरा वसीम आहे. ती सध्या तिचा 24 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

3/7

दंगल

जायरा वसीमने वयाच्या 16 व्या वर्षी करिअरची सुरुवात केली आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे 'दंगल'. हा चित्रपटात सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 

4/7

सीक्रेट सुपरस्टार

'दंगल' चित्रपटाने जगभरात 2024 कोटी रुपयांची कमाई केली होती. यासोबत 'सीक्रेट सुपरस्टार' चित्रपटाने देखील चांगली कमाई केली होती.

5/7

965 कोटींची कमाई

भारतामध्ये हा चित्रपट इतका नाही चालला पण चीनमध्ये या चित्रपटाने चांगली कमाई केली. 'सीक्रेट सुपरस्टार' चित्रपटाने एकूण 965 कोटींची कमाई केली. 

6/7

द स्काई इज़ पिंक

जायरा वसीमने 16 व्या वर्षी 'दंगल' हा चित्रपट केला होता. तर 2019 मध्ये 'द स्काई इज़ पिंक' या चित्रपटात काम केल्यानंतर अभिनेत्री अभिनयापासून दूर झाली. 

7/7

3000 कोटींची कमाई

इंडस्ट्रीपासून दूर जाण्याचा तिचा हा निर्णय चाहत्यांना धक्का देणारा होता. तिने 4 वर्षांच्या करिअरमध्ये 3 चित्रपट केले. यामधील दोन चित्रपटांनी 3000 कोटींची कमाई केली.