'या' 7 अभिनेत्रींनी सलमानसोबत काम करण्यास दिला थेट नकार

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानसोबत काम करणं म्हणजे कोणत्याही कलाकारासाठी असलेली ही मोठी गोष्ट आहे. सलमानच्या एका चित्रपटात काम केल्यानं फक्त करिअर होतं. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अनेकदा सलमानसोबत काम करण्याच्या संधीला नकार दिला आहे. स्वत: सलमाननं देखील या अभिनेत्रींना चित्रपटाच्या ऑफर दिल्या, पण तरीही त्या अभिनेत्रींनी नकार दिला. चला तर त्या अभिनेत्रींविषयी जाणून घेऊया....  

| May 29, 2024, 18:00 PM IST
1/7

श्रद्धा कपूर

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच तिला चित्रपटाची ऑफर दिली होती. रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी श्रद्धा ही 16 वर्षांती होती त्यामुळे तिनं चित्रपटासाठी नकार दिला. 

2/7

इलियाना डीक्रूज

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डीक्रुजला सलमान खाननं 'किक' या चित्रपटासाठी ऑफर दिली होती. मात्र, तिनं यासाठी नकार दिला.   

3/7

सोनाली बेंद्रे

सोनाली बेंद्रेनं सलमान खानसोबत 'हम साथ साथ है' या चित्रपटात काम केलं. यानंतर सोनालीनं पुन्हा सलमानसोबत काम करण्यास नकार दिला. 

4/7

दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोणला सलमान खानसोबत अनेक चित्रपटांसाठी ऑफर मिळाली होती. पण आजपर्यंत तिनं सलमानसोबत काम केलं नाही. 

5/7

कंगाना रणौत

कंगना रणौतला सलमानच्या 'सुल्तान' या चित्रपटासाठी ऑफर मिळाली होती. पण तिनं त्या चित्रपटाला नकार दिला. त्याचं कारण हे होतं की तिला अशा कोणत्याही चित्रपटात काम करायचं नव्हतं ज्यात तिची भूमिका ही छोटी आहे. 

6/7

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रानं सलमानच्या 'भारत' या चित्रपटाच्या ऑफरला नकार दिला होता. मात्र, तिनं नकार देण्याचं कोणतंही कारण असं समोर आलं नव्हतं. 

7/7

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या आणि सलमान खान कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांनी 'हम दिल दे चुके सनम' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय पण त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतर सलमानसोबत काम करण्यास ऐश्वर्यानं स्पष्ट नकार दिला होता.