80 Kg वजन उचलायला गेली अन्...; अभिनेत्रीबरोबर धक्कादायक प्रकार! वाढदिवसाच्या 1 तासआधीच..

Actress Suffers Serious Injury After 80 Kg Deadlift: व्यायाम करताना काळजी घेणं आवश्यक असतं असं अनेकदा सांगितलं जातं. प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली व्यायाम करावं असं सांगितलं जातं. मात्र या अभिनेत्रीनं हे ऐकलं नाही. नेमकी ही अभिनेत्री कोण आणि तिच्यासोबत घडलं काय पाहूयात...

Swapnil Ghangale | Oct 19, 2024, 15:25 PM IST
1/15

rakulpreet

व्यायाम करताना झालेल्या दुखापतीकडे दुर्लक्ष केल्यास काय होतं याचा उत्तम नमुना म्हणजे या अभिनेत्रीचं उदाहरण घेता येईल. नेमकं घडलं काय जाणून घेऊयात...

2/15

rakulpreet

व्यायाम करताना प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करा असं सांगितलं जातं. मात्र सर्व सामान्यांना दिला जाणारा हाच सल्ला एका अभिनेत्रीने न ऐकल्याने तिच्यावर नको ते संकट ओढावल्याचा प्रकार नुकताच घडला.  

3/15

rakulpreet

'दे दे प्यार दे 2' चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगणबरोबर झळकणारी ही सुंदर अभिनेत्री नुकतीच व्यायाम करताना गंभीर जखमी झाली.

4/15

rakulpreet

आपल्या व्यायामादरम्यान 80 किलोच्या डेडलिफ्ट करताना या अभिनेत्रीला गंभीर दुखापत झाली आहे.

5/15

rakulpreet

मागील आठवड्याभरापासून ही अभिनेत्री बेड रेस्टवर असून हळूहळू रिकव्हर होत आहे, अशी माहिती समोर आली आहे.

6/15

rakulpreet

ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलतोय तिचं नाव आहे रकुल प्रित सिंग! अभिनेता तसेच निर्माता जॅकी भगनानीची पत्नी असलेली रकुल व्यायाम करताना जखमी झाली.   

7/15

rakulpreet

"हा सारा प्रकार 5 ऑक्टोबर रोजी सुरु झाला जेव्हा रकुल नेहमीप्रमाणे व्यायाम करत होती. तिने 80 किलो वजन उचलत डेडलिफ्ट केलं. यावेळेस तिने कंबरेचा बेल्ट वापरला नव्हता. त्यामुळेच तिच्या पाठीचे स्नायू दुखावले," असं अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं.

8/15

rakulpreet

मात्र पाठीचे स्नायू दुखावल्यानंतरही रकुलने व्यायाम सुरुच ठेवला आणि त्याचा अधिक वाईट परिमाण तिच्या पाठीवर झाला. तिला डॉक्टरांनी आठवडाभर आराम करण्यास सांगितला आहे.  

9/15

rakulpreet

पाठीला दुखापत झालेली असतानाही रकुलने 'दे दे प्यार दे 2' चित्रपटाचं शुटींग सुरु ठवलं. ती सलग दोन दिवस पाठ दुखत असतानाही सेटवर जाऊन काम करत होती, असं अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं.   

10/15

rakulpreet

तीन दिवस त्रास सहन केल्यानंतर रकुलने डॉक्टरांना भेट घेतली. त्यावेळी तिने व्यायम करातना झालेल्या दुखापतीनंतर दर तीन ते चार तासांनी पाठ अचानक जोरात दुखू लागते, असं रकुलने सांगितलं.

11/15

rakulpreet

मात्र 10 ऑक्टोबरच्या रात्री रकुलच्या पाठीत जोरदार कळ आली. वाढदिवसाला एक तास शिल्लक असताना तिला असहाय वेदना होऊ लागल्याच्या तिच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं. 

12/15

rakulpreet

रकुलने सातत्याने दुर्लक्ष केल्याने तिच्या कण्याचे एल4, एल5, एल1 जवळचे स्नायू आक्रसल्याचं समोर आलं. तिचा रक्तदाबही कमी झाला. तिला अचानक घाम येऊ लागला. तिला शांत करण्यासाठी बेडवरच झोपवण्यात आलं.  

13/15

rakulpreet

वाढदिवसाच्या दिवशीच रकुल बेडला खिळून होती. तिला इंजेक्शन देण्यात आले. ती आठवडाभरापासून आराम करत आहे. 

14/15

rakulpreet

"व्यायाम करताना जखमी झालेली रकुल मागील काही दिवसांपासून पूर्ण बेड रेस्टवर आहे. मात्र तिची प्रकृती थोडी चिंता करण्यासारखीच आहे," असं एका जवळच्या व्यक्तीने सांगितलं आहे.   

15/15

rakulpreet

रकुलची संथ गतीने रिकव्हरी सुरु आहे. ती कायमच दुखणं अंगावर काढणाऱ्यांपैकी असून यामधून तिला धडा मिळाला असेल असं तिच्या जवळच्या व्यक्तीने म्हटलं आहे.