मिताली मयेकरच्या सासूने केलं दुसरं लग्न, अभिनेत्रीने शेअर केले फोटो! पाहा शानदार लग्नसोहळा

Seema Chandekar Marriage Photos: नुकतंच सिद्धार्थ चांदेकरच्या आईचा विवाहसोहळा पार पडला. या शानदार विवाहानंतर लगेच अभिनेत्याने पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

Aug 23, 2023, 17:41 PM IST

मुंबई : नुकतंच सिद्धार्थ चांदेकरच्या आईचा विवाहसोहळा पार पडला. या शानदार विवाहानंतर लगेच अभिनेत्याने पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ही पोस्ट शेअर करत सिद्धार्थने कॅप्शनमध्ये लिहीलं की, Happy Second Innings आई!तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई!

1/7

काही वेळापुर्वी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या आईच्या लग्नाची पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली

2/7

या पाठोपाठ आता सिद्धार्थची पत्नी मिताली मयेकरने एक गोड पोस्ट शेअर करत तिच्या सासूबाई सीमा चांदेकर यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

3/7

या पोस्टमध्ये मितालीने लग्नाचे काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलंय की....

4/7

''Happy married life सासूबाई!माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते?

5/7

खरंच मला अभिमान वाटते तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा.

6/7

आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.''

7/7

मितालीच्या या पोस्टनंतर तिचे चाहते तिच्या सासूच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.