ही अभिनेत्री 'गूगल इंडिया'च्या प्रमुख पदावर

Apr 05, 2019, 14:45 PM IST
1/8

मयुरी कांगो हिची नुकतीच गूगल इंडियात एजन्सी पार्टनरशीपची उद्योग प्रमुख निवड करण्यात आली.

2/8

१९९५ मध्ये बाबरी मस्जिदच्या मुद्द्यावर आधारीत सिनेमा 'नसीम' या सिनेमातून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 

3/8

मयुरीला १९९६ मध्ये आलेल्या 'पापा कहते हैं'पासून बॉलिवूडमध्ये नवी ओळख मिळाली होती.

4/8

मयुरीनं बेताबी, होगी प्यार की जीत, बादल या सिनेमांतही काम केलं आहे. 

5/8

छोट्या पडद्यावरच्या कही किसी रोज, किटी पार्टी, कुसुम तसंच क्या हादसा क्या हकीकत यांसारख्या कार्यक्रमांतही ती झळकली होती. 

6/8

मयुरी कांगो यापूर्वी एका 'परफॉर्मिक्स' या मार्केटींग एजन्सीसोबत व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत होती.

7/8

नवीन जबाबदारीसह गूगलचा एक भाग बनल्याने मी आनंदी असल्याचं तिनं सांगितलं. 

8/8

व्यावसायिक आयुष्यात पुढील टप्प्यासाठी काम करण्यास उत्साही असल्याचं मयुरीनं म्हटलं आहे.