काजोल अभिनयापासून सतत ब्रेक का घेते? 'दो पत्ती'मधील अभिनेत्रीने सांगितले धक्कादायक कारण

काजोल बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, ती वारंवार चित्रपटांमधून ब्रेक घेत असते.

Soneshwar Patil | Oct 24, 2024, 14:15 PM IST

काजोल अभिनयापासून सतत ब्रेक का घेते? 'दो पत्ती'मधील अभिनेत्रीने सांगितले धक्कादायर कारण | Actress Kajol Revealed the Reason Why She Takes frequent Break From Films 

1/6

टॉप अभिनेत्री

काजोल बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. सध्या ती तिच्या 'दो पत्ती' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

2/6

दो पत्ती

काजोल सध्या तिच्या 'दो पत्ती' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.  दरम्यान, अभिनेत्रीने एक मोठा खुलासा केला आहे की ती तिच्या कामातून वारंवार ब्रेक का घेते.

3/6

सर्वात कमी काम

दरम्यान, इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत काजोलने सांगतिले की ती सतत अभिनयापासून ब्रेक का घेत असते. त्यासोबत तिने स्वत: ला सर्वात कमी काम करणारी अभिनेत्री असं म्हटलं आहे. 

4/6

फिल्मोग्राफी

जर तुम्ही माझी फिल्मोग्राफी पाहिली तर मी कदाचित सर्वात कमी काम करणारी अभिनेत्री आहे. काजोलची आई, आजी तिला नेहमी म्हणायची की काम तुझ्या आयुष्याचा भाग आहे. तुझ्या संपूर्ण आयुष्याचा नाही.   

5/6

ब्रेक

पुढे काजोल म्हणाली की, मी ब्रेक घेतला. मला लग्न करून मुलांना जन्म देयचा होता. मी अजूनही काम करत आहे. पण तिने तिच्या कामामुळे ब्रेक घेतला होता.

6/6

निर्णय

प्रत्येक स्त्रीला निर्णय घ्यावा लागेल की आता मी विश्रांती घेईन आणि जर मला परत यायचे असेल तर मी परत येईन आणि तिला हवे असेल तर ती तसे करू शकले.