'त्या मोबदल्यात मला...', 'तुला पुढची कतरीना बनवतो' म्हणत अभिनेत्रीकडे 'तसल्या' गोष्टीची मागणी

Actress Asked For Favour: अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या संघर्षातील दिवसांबद्दल सविस्तर प्रतिक्रिया नोंदवताना तिला आलेल्या कटू अनुभवांबद्दल भाष्य केलं. नेमकं ती काय म्हणाली जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Nov 04, 2024, 15:02 PM IST
1/10

norafatehi

बॉलिवूडची डान्सिंग क्वीन अशी ओळख असलेल्या नोरा फतेहीला मनोरंजनसृष्टीमध्ये 10 वर्ष झाली आहेत.  

2/10

norafatehi

मात्र नोराचा मनोरंजनसृष्टीमधील प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता.   

3/10

norafatehi

2014 साली फगली चित्रपटातून मनोरंजनसृष्टीमध्ये पदार्पण करणाऱ्या नोराने आतापर्यंत 44 हून अधिक चित्रपट आणि गाण्यांमध्ये काम केलं आहे.  

4/10

norafatehi

आपल्या संघर्षाच्या कालावधीसंदर्भात नोराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सविस्तर भाष्य केलं.  

5/10

norafatehi

कशाप्रकारे आपल्याला कामाची गरज असताना आपला गैरफायदा घेण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला याबद्दल नोराने सांगितलं.  

6/10

norafatehi

"मी तुला बॉलिवूडची पुढची कतरिना कैफ बनवू शकतो. पण या मोबदल्यात तू मला काय देणार?" असा प्रश्न एका निर्मात्याने आपल्याला विचारला होता असं नोराने म्हटलं आहे.  

7/10

norafatehi

"मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला बऱ्याच बावळट लोकांना फॉलो करत होते. अनेकदा त्यांनी माझ्याकडे थेट काही फेव्हर मागितले होते," असं नोराने राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

8/10

norafatehi

संघर्षाचा हा कालावधी आपल्या मानसिक आरोग्यासाठी फारच धोकादायक होता, असं सांगताना नोराने या काळात मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतल्याचंही सांगितलं.  

9/10

norafatehi

नोरा आज यशाच्या शिखरावर आहे. आज तिला बॉलिवूडमधील डान्सिंग क्वीन म्हणून ओळखलं जातं. तिने अल्पावधीत आपली ही नवी ओळख तयार केली आहे.  

10/10

norafatehi

नोराने तिच्या नृत्य कौशल्याने अनेक आयटम साँगला चारचाँद लावल्याचं पाहायला मिळालं आहे.