2 पत्नी, 4 मुलं.. यूट्यूबरने सांगितला सुखी जीवनाचा मंत्र, 'आम्ही बेडरूममध्ये...'

प्रसिद्ध यूट्यूबर आणि अभिनेता अरमान मलिक हा त्याच्या दोन लग्नांमुळे चर्चेत असतो. एकाच घरात त्याच्या दोन्ही पत्नींसोबत राहिल्यामुळे अरमानला खूप ट्रोल केले जाते. दोन लग्नांना प्रोत्साहन देऊन लोकांना चुकीचा संदेश दिल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. आता अरमानने ट्रोलच्या या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. चला तर जाणून घेऊया काय म्हणाला अरमान...

| Apr 01, 2024, 18:58 PM IST
1/7

अरमान मलिक

अरमान मलिक हा एक लोकप्रिय युट्यूबर आहे. तो सतत त्याच्या कुटुंबासोबत वेगवेगळे व्लॉग शेअर करताना दिसतो. त्याच्यावर चुकीचा संदेश देण्याचा आरोप आहे. त्यावर अरमाननं प्रतिक्रिया दिली आहे. 

2/7

दोन लग्नांना प्रोत्साहनाचे आरोप

या आरोपांवर अरमान म्हणाला, "मला वाटतं की माझ्या दोन्ही पत्नींसोबत मला कोणीही एकत्र जेवण करताना पाहिलेलं नाही."

3/7

एकाच बेड नाही पाहिलं

पुढे अरमान म्हणाला, "आम्हाला एकाच बेडवर कोणीही पाहिलं नसेल. आपली मूल्येच अशी आहेत. आपण आमच्या पालकांना कधीच एकमेकांशी जवळीक साधताना पाहिले नाही. मग आम्ही हे सगळं कसं दाखवायचं?"

4/7

विवाहीत असताना पहिल्या पत्नीचा विचार केला नाही?

अरमानला असेही विचारण्यात आले होते की, "जेव्हा त्याने पहिली पत्नी असतानाही कृतिकाशी दुसरे लग्न केले तेव्हा त्याने पायलचा विचार का केला नाही का?"

5/7

पायल मैत्रिणीसारखी

अरमान म्हणाला, 'ही काही इतकी चिंतेची बाब नाही. पायल एक मैत्रिणीसारखी आहे, तिला सर्व काही माहित आहे. आता जुन्या गोष्टी विसरून जायला हवं.'

6/7

या प्रश्नाचे उत्तर देताना अरमान अडकला तेव्हा पायलनेमध्येच येऊन पतीचा बचाव करताना म्हटलं  की ''हा विचार त्याच्या मनात नक्कीच आला असेल, पण नंतर तो कृतिकाच्या प्रेमातही पडला होता, त्यामुळे तो आम्हा दोघांबद्दल द्विध मन:स्थितीत होता, कारण तो दोघांच्या प्रेमात पडला आणि तो दोघांना सोडू शकत नव्हता''. 

7/7

अरमान मलिकला त्याच्या दोन्ही पत्नींपासून 4 मुले आहेत. तो आपल्या कुटुंबासह आनंदी जीवन जगतो.