भर उन्हाळ्यातही ACचं बिल येईल कमी, 'या' 5 टिप्स आजच वापरा, होईल बचत!

एप्रिलचा महिना सुरू आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. अद्याप मे महिना बाकी आहे. तरीही उष्णतेमुळं नागरिक हैराण झाले आहेत. अशावेळी घरात 24 तास एसी आणि पंखे सुरू असतात. उष्णता वाढल्यामुळं विजेचे बीलदेखील जास्त येते. विजेचे बील कमी येण्यासाठी हे उपाय वापरुन पाहा. 

| Apr 05, 2024, 18:47 PM IST

AC Power Saving Tips: एप्रिलचा महिना सुरू आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. अद्याप मे महिना बाकी आहे. तरीही उष्णतेमुळं नागरिक हैराण झाले आहेत. अशावेळी घरात 24 तास एसी आणि पंखे सुरू असतात. उष्णता वाढल्यामुळं विजेचे बीलदेखील जास्त येते. विजेचे बील कमी येण्यासाठी हे उपाय वापरुन पाहा. 

 

1/7

भर उन्हाळ्यातही ACचं बिल येईल कमी, 'या' 5 टिप्स आजच वापरा, होईल बचत!

ac power saving tips to reduce electricity bill during summers

उन्हाळ्यात वीजेचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येतो. 24 तास पंखा आणि एसी सुरू असल्याने वीजबिल जास्त येते. मात्र आज आम्ही तुम्हाला ACचा वापर करुनही बिल कसे कमी येईल, याच्या टिप्स सांगणार आहोत.   

2/7

5 टिप्स

ac power saving tips to reduce electricity bill during summers

एसी वापरण्याच्या या टिप्स वापरुन तुमचेही विजेची बील कमी येऊ शकते. जाणून घेऊया या टिप्स.

3/7

ACचे तापमान

ac power saving tips to reduce electricity bill during summers

अनेकांना असं वाटतं की ACचे तापमान कमी केल्याने घरात जास्त थंड वाटेल. मात्र ही पद्धत तुमच्या खिशालाही परवडणारी नाहीये. एका रिपोर्टनुसार, 24 डिग्री सेल्सियसपर्यंत तापमान ठेवणे सगळ्यात बेस्ट असू शकते. त्याचबरोबर तापमान एक डिग्री कमी केल्याने वीजेचे बील 6टक्क्यांनी वाढेल. त्यासाठी एसीचे तापमान 20-24 डिग्रीच्या मध्ये ठेवायला पाहिजे. यामुळं घरातदेखील थंडावा राहिल आणि विजेचे बिलदेखील कमी येईल

4/7

फिल्टर

ac power saving tips to reduce electricity bill during summers

ACमध्ये एक फिल्टर असतो जे धुळ आणि माती रोखते. जर हे फिल्टर जास्त खराब झाले तर AC ला थंड हवा निर्माण करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. ज्यामुळं वीज जास्त खर्च होते. त्यामुळं हा फिल्टर प्रत्येक महिन्याला साफ करा आणि वर्षातून कमीत कमी 1-2 वेळा एसीची सर्व्हिसिंग करुन घ्या. त्यामुळं पैशांची बचत होईल. 

5/7

थंड हवा

ac power saving tips to reduce electricity bill during summers

एसी वापरताना एका गोष्टीची काळजी घ्या की, थंड हवा खोलीच्या बाहेर जाऊ देऊ नका. त्यासाठी खोलीच्या खिडक्या व दरवाजे बंद करा. तुम्ही दरवाज्यावर क्लोजरदेखील लावू शकता. जर तुमची खोली जास्त थंड असेल तर तुम्हाला एसी सारखा सारखा लावावा लागणार नाही आणि विजेचे बिलदेखील वाचेल.

6/7

पंखा

ac power saving tips to reduce electricity bill during summers

पंखा खोलीतील हवेचे सर्कुलेशन वाढवते. ज्यामुळं थंड हवा सगळीकडे नीट पसरते. जर तुम्ही एसी लावल्यानंतर खोली थंड झाली असेल तर एसी बंद केल्यानंतर तुम्ही पंखा सुरू करु शकता. त्यामुळं एसी कमी वेळ वापरावा लागेल आणि विजेची बचतदेखील होईल. 

7/7

टायमर

ac power saving tips to reduce electricity bill during summers

एसीमुळं जास्त येणारे विजेचे बील कमी येण्यासाठी तुम्ही जर रात्री झोपताना एसी लावत असाल तर टायमर सेट करायला विसरु नका. ज्यामुळं 1-2 तासांनंतर एसी आपोआप बंद होईल. यामुळं एसी रात्रभर लावावा लागणार नाही आणि विजेचीदेखील बचत होईल.