IND vs ZIM 3rd T20I : टीम इंडियाचा कॅप्टन धर्मसंकटात! काळजावर दगड ठेऊन शुभमनला घ्यावा लागणार 'हा' निर्णय

IND vs ZIM 3rd T20 Playing XI : झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात दणक्यात विजय मिळवला. अशातच आता तिसऱ्या सामन्यापूर्वी शुभमन गिलला (Shubhman Gill) टेन्शन आलंय.

Saurabh Talekar | Jul 08, 2024, 21:01 PM IST
1/5

शुभमन गिलला टेन्शन

टीम इंडियाच्या निवड समितीने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या दोन टी-ट्वेंटी सामन्यांसाठी संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांच्या जागी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांची निवड केली होती.

2/5

तीन मोठे निर्णय

अशातच आता संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांची उर्वरित मालिकेसाठी कमबॅक झालंय. त्यामुळे आता टीममध्ये तीन मोठे निर्णय घ्यावे लागतील.

3/5

अभिषेक शर्मा की यशस्वी जयस्वाल?

सलामीवीर म्हणून अभिषेक शर्माने स्वत:ला सिद्ध जरी केलं असतं तरी देखील यशस्वी जयस्वालला बेंचवर बसवावं का? असा मोठा सवाल शुभमन गिलसमोर आहे.

4/5

विकेटकीपर कोण?

तर विकेटकीपर कोण असेल? असा प्रश्न देखील विचारला जात आहे. कारण, संजू सॅमसनची एन्ट्री झाल्याने आता ध्रुव जुरेलचं संघातील स्थान धोक्यात आलंय.

5/5

रिंकू की दुबे?

तर युवा फिनिशर रिंकू सिंग याला पुन्हा संधी मिळणार का? की वर्ल्ड कप स्टार शिवम दुबे याला? यावर कॅप्टन शुभमन गिलला मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.