3 वेळा बदलले चित्रपटाचे नाव, 70 कोटीच्या 'या' चित्रपटाने केली होती इतकी कमाई

70 कोटीमध्ये बनवलेल्या या चित्रपटाचे 3 वेळा बदलले होते नाव. बॉक्स ऑफिसवर केली होती जबरदस्त कमाई. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Oct 30, 2024, 15:17 PM IST
1/6

2012 मधील चित्रपट

2012 मध्ये आमिर खानचा 'तलाश' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, राणी मुखर्जी, राजकुमार राव आणि शीबा चड्ढा होते.   

2/6

आमिर खान

या चित्रपटात आमिर खानने पोलीस इंस्पेक्टरची भूमिका साकारली होती. तर रानी मुखर्जी यांनी आमिर खानच्या बायको भूमिका साकारली होती. 

3/6

तलाश

IMDb च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे नाव 3 वेळा बदलण्यात आले होते. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव 'धुआं' होते. त्यानंतर 'एक्ट ऑफ मर्डर' आणि 'जख्मी'. शेवटी या चित्रपटाचे नाव 'तलाश' ठेवले.

4/6

चित्रपटाला नकार

आमिर खान 'तलाश' चित्रपटाचा निर्माता देखील होता. हा चित्रपट सैफ अली खान, सलमान खान आणि शाहरुख खान यांना देखील ऑफर करण्यात आला होता. पण त्यांनी नकार दिला.

5/6

चित्रपटाचा निर्माता

त्यानंतर हा चित्रपट आमिर खानकडे गेला. रीमा कागतीने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 'तलाश'चा निर्माता आमिर खान होता. 

6/6

कमाई

रिपोर्टनुसार, आमिर खान आणि राणी मुखर्जी यांचा 'तलाश' चित्रपट 70 कोटींमध्ये बनवला होता. या चित्रपटाने जगभरात 180.83 कोटी रुपयांची कमाई केली होती.