दिल्ली निवडणूक निकालात लक्ष वेधून घेणारी दृश्य

दिल्ली निवडणूक निकालात आज लक्ष वेधून घेणारी काही दृश्य खास तुमच्यासाठी....

| Feb 11, 2020, 13:43 PM IST
1/9

९. आपच्या यशानंतर आप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला...या जल्लोषादरम्यान काही कार्यकर्त्यांनी चक्क अमित शाह यांच्या पोस्टरला आपची निशाणी असलेल्या झाडूने चक्क फटके मारत आपला रोष व्यक्त केला...

2/9

८. पुन्हा एकदा जनतेने आपला दिलेल्या कौलामुळे भाजप आणि काँग्रेस पक्ष तोंडघशी पडले. निकालादरम्यान भाजप आणि काँग्रेस दोन्ही कार्यालयाबाहेर शुकशुकाट पाहायला मिळाला.

3/9

७. आपला दिल्लीत आपलीच सत्ता येईल असा विश्वास होता...आणि त्यामुळे आपने आधीच एक प्रमोशनल साँग तयार केलं...लगे रहो केजरीवाल असे या गाण्याचे बोल आहेत...आपच्या निकालानंतर आप कार्यालयात या गाण्यावर सर्व कार्यकर्त्यांनी एकच ताल धरला.

4/9

६. आपला मिळालेली मत पाहून आप कार्यकर्त्यांनी लागलीच मिठाईचं वाटप करत आनंद व्यक्त केला...अमृतसरमध्येही आप कार्यकर्त्यांनी आपची टोपी घालत, केजरीवालचे टीशर्ट घालत लाडू वाटले...आणि टीशर्टवरच्या केजरीवाल यांच्या फोटोलाही भरवले..

5/9

५. दिल्ली निवडणुकीचा निकाल लागायच्या आधीच आपला आपलाच विजय होणार याचा विश्वास होता...आणि त्यामुळे निकाल जाहीर होण्याआधीच आपने आपलं कार्यालय फुग्यांनी आणि फुलांनी सजवलं होतं...खास करून आप अर्थात आम आदमी पार्टी असं फुग्यांवर लिहिलेले निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे फुगे लावण्यात आले 

6/9

४. अरविंद केजरीवाल यांच्या आप कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी अनोखी पोस्टरबाजी करत केजरीवाल यांना आपलं समर्थन दर्शवलं...सौ सवाल एक केजरीवाल अशा अर्थाचे वेगवेगळे पोस्टर कार्यालयाबाहेर लावण्यात आले....

7/9

३. निकाल जसजसा लागत गेला तसतसं भाजप मागे पडत असल्याचं चित्र स्पष्ट होत गेल्यामुळे भाजपच्या कार्यालयाबाहेर अनोखी पोस्टरबाजी पाहायला मिळाली. या पोस्टरवर विजयाने आम्ही अंहकारी होत नाही तर पराभवाने आम्ही निराश होत नाही अशा अर्थाच मजकूर लिहिण्यात आला होता. ही पोस्टरबाजी भाजप कार्यालया बाहेर करण्यात आली.

8/9

२. आपच्या या छोट्या समर्थकाच्या छोट्या बहिणेनेही अरविंद केजरीवाल यांना निकालाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या...केजरीवाल यांच्या घराबाहेर गुलाबाच्या फुलांनी ऑल द बेस्ट असा संदेश लिहित तीने केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या.

9/9

१. दिल्ली निवडणुकीची मतमोजणी सुरु होण्याआधीच आपच्या एका छोट्या समर्थकाने साऱ्याचं लक्ष वेधून घेतलं. अरविंद केजरीवाल यांच्या वेशभूषेत हो छोटा समर्थक त्यांच्या घराबाहेर पहाटेपासून हजर होता.