90 लाख सूर्य गिळंकृत करण्याची क्षमता असलेला ब्लॅक होल सापडला; ब्रम्हांडाचे रहस्य उलगडणार

हा ब्लॅक होल आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॅक होल असल्याचा दावा केला जात आहे. प्रकाशही या ब्लॅक होलमधून बाहेर पडू शकणार नाही.

Jul 20, 2023, 21:16 PM IST

 Black Hole : कृष्णविवर अर्थात  ब्लॅक होल पासून ब्रम्हांडाची निर्मीती झाली असा दावा केला जातो. मात्र, या ब्लॅक होलचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. अशातच एक सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल सापडला आहे. हा ब्लॅक होल आकाराने इतका मोठा आहे की यामध्ये 90 लाख सूर्य  गिळंकृत करण्याची क्षमता आहे.

1/9

NASA ने आपल्या हबल स्पेस टेलिस्कोपमध्ये हा ब्लॅक होल दिसून आला आहे. 

2/9

 CEERS 1019 या ब्लॅक होल बाबत अधिक संशोधन सुरु आहे. या संशोधनात यश आल्यास ब्रम्हांडाचे रहस्य उलगडू शकते असा देखील दावा केला जात आहे. 

3/9

एलियन, टाइम ट्रॅव्हल, पॅरलल युनिव्हर्स या संकल्पना इतकंच कुतूहल ब्लॅक होल बद्दलही आहे. ब्लॅक होलमध्ये गेलेली कोणतीही वस्तू परत येत नसल्यामुळे ब्लॅक होलच्या आतमध्ये नक्की काय आहे याचा उलगडा झालेला नाही. 

4/9

ब्लॅक होलमध्ये अतिशय तीव्र क्षमतेचे गुरुत्वाकर्षण असते. यामुळे प्रकाश देखील या ब्लॅक होलमध्ये खेचला जातो.

5/9

क्लिअर फ्युजन प्रक्रियेद्वारे तारे उष्णता आणि प्रकाश देत असतात. यांची क्षमता संपल्यावर ते आकुंचन पावतात आणि त्यांची घनता वाढून ब्लॅक होल तयार होतं.

6/9

CEERS 1019 ब्लॅक होलसह आणखी दोन कृष्णविवरे सापडली, जी बिग बँगच्या 1 अब्ज वर्षांनंतर तयार झाली. यासोबतच 11 आकाशगंगाही सापडल्या, ज्या करोडो वर्ष जुन्या आहेत.

7/9

टेक्सास विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ स्टीव्हन फिंकेलस्टीन यांच्या टीमने हे ब्लॅक होल शोधले आहे.

8/9

ब्लॅक होल संशोधकांसाठी देखील न उलगडलेले रहस्य आहे. 

9/9

CEERS 1019 असे या ब्लॅक होलचे नाव आहे.