लोकसभा निवडणूक २०१९: बिहारमध्ये ९ महिला निवडणुकीच्या रिंगणात

Apr 01, 2019, 17:26 PM IST
1/7

पाटलीपूत्र येथून मीसा भारती आरजेडीच्या उमेदवारी

पाटलीपूत्र येथून मीसा भारती आरजेडीच्या उमेदवारी

मीसा भारती या पाटलीपूत्र येथून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. 2014 मध्ये त्यांचा भाजप उमेदवार रामकृपाल यादव यांनी पराभव केला होता. मीसा भारती सध्या राज्यसभा खासदार आहेत.

2/7

मीरा कुमार यांना काँग्रेसची सासाराम मतदारसंघातून उमेदवारी

मीरा कुमार यांना काँग्रेसची सासाराम मतदारसंघातून उमेदवारी

माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना काँग्रेसने सासाराम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्ये त्यांचा याच मतदारसंघातून पराभव झाला होता.

3/7

रंजीता रंजन यांना पुन्हा उमेदवारी

रंजीता रंजन यांना पुन्हा उमेदवारी

खासदार पप्पू यादव यांची पत्नी रंजीता रंजन या सुपौल लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या खासदार आहेत. काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे.

4/7

राजवल्लभ यादव यांच्या पत्नी विभा देवी यांना आरजेडीकडून उमेदवारी

राजवल्लभ यादव यांच्या पत्नी विभा देवी यांना आरजेडीकडून उमेदवारी

आरजेडीमधून निलंबित आमदार राजवल्लभ यादव यांच्या पत्नी विभा देवी यांना नवादा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारी वादात सापडली आहे. कारण राजवल्लभ यादव बलात्कार प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहेत.

5/7

बाहुबली नेता अनंत सिंह यांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

बाहुबली नेता अनंत सिंह यांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

बाहुबली नेता अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी यांना उमेदवारी दिली आहे. मुंगेरमधून ते निवडणूक लढवणार आहेत.

6/7

जेडीयूच्या कविता सिंह आणि आरजेडीच्या हिना शहाह यांच्यात टक्कर

जेडीयूच्या कविता सिंह आणि आरजेडीच्या हिना शहाह यांच्यात टक्कर

जेडीयूने सिवान मतदारसंघातून कविता सिंह यांना तर आरजेडीने हिना शहाब यांना उमेदवारी दिली आहे. सिवान मतदारसंघातून या २ महिला उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर आहे.

7/7

शिवहर येथून भाजपने रमा देवी यांना उमेदवारी दिली आहे.

शिवहर येथून भाजपने रमा देवी यांना उमेदवारी दिली आहे.

शिवहर मतदारसघातून भाजपने रमा देवी यांना उमेदवारी दिली आहे. आरजेडी अजून येथून उमेदवार घोषित केलेला नाही.