Tea Powder Hack : वापरलेली चहा पावडर फेकण्याआधी 100 वेळा विचार करा, तुमची 5 कामं सोपी करेल

Used Tea Powder Hack : चहाचे प्रेमी तर अनेकजण असतात. मात्र चहा बनवल्यानंतर अनेक चहा फिल्टर करतो आणि चहाची पाने वेगळी करतो. उरलेली चहाची पाने आपण फेकून देतो. पण त्यांचा खूप उपयोग होतो. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. उरलेली चहाची पाने आपण अनेक कामांसाठी वापरू शकतो. त्वचा आणि केसांपासून घराच्या स्वच्छतेपर्यंत याचा उपयोग होऊ शकतो. चला जाणून घेऊया चहाची पाने कोणत्या कामासाठी वापरली जाते.

Jan 09, 2023, 18:36 PM IST
1/5

5 Surprising Things You Can Do with Used Tea Powder Tips in Marathi

चहाची पाने केसांसाठी खूप फायदेशीर असतात. उरलेली चहाची पाने केसांना चमकदार करण्यासाठी वापरली जातात. त्यासाठी सुरूवातीला चहाची पाने पाण्याने धुवून स्वच्छ करा. त्यात चांगले पाणी मिसळून उकळावे. चहाच्या पानाचे पाणी थंड झाल्यावर त्याने केस धुवा. 

2/5

5 Surprising Things You Can Do with Used Tea Powder Tips in Marathi

चहाच्या पानामुळे गुडघे आणि कोपरांचा काळेपणा दूर होतो. सर्वप्रथम ते स्वच्छ करा आणि कोरडे करा. आता ते बारीक करून त्यात बेकिंग सोडा आणि पाणी मिसळा. कोपर आणि गुडघ्यांवर स्क्रब करून ते लावा. 

3/5

5 Surprising Things You Can Do with Used Tea Powder Tips in Marathi

चहाची पाने जखमा भरण्याचे काम करतात. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स जखमा भरण्यास मदत करतात. चहाची पाने साफ केल्यानंतर पाण्यात उकळा. दुखापतीवर लावा आणि नंतर काही वेळाने दुखापत झालेली जागा धुवा.

4/5

5 Surprising Things You Can Do with Used Tea Powder Tips in Marathi

चहाची पाने भेगा पडलेल्या टाचांना बरे करण्याचे काम करतात. कोरड्या चहाच्या पानात ओट्स आणि खोबरेल तेल मिसळून ते टाचांवर स्क्रब केल्याने डेड स्किन निघून जाईल. मॉइश्चरायझर लावा त्यामुळे टाच तुमच्या नीट होतील. 

5/5

5 Surprising Things You Can Do with Used Tea Powder Tips in Marathi

चहाच्या पानांचे पाणी साबणाच्या भांडी साफ करण्यासाठी ही करते. जेव्हा तेलकट भांडी साफ करणे कठीण होते तेव्हा चहाची पाने घालून पाणी उकळवा. या पाण्यात डिशवॉश मिसळून भांडी स्वच्छ करा.