मस्तच ! भारतात लॉन्च 8 एअरबॅग असलेली 5 सीटर कार, बटण दाबताच ऑटोमेटिक पार्क होईल

प्रीमियम सेडान कार स्कोडाने शुक्रवारी आपली 4th जनरेशन कार ऑक्टाव्हिया (Skoda Octavia)  भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने ही दोन प्रकारांमध्ये बाजारात आणली असून त्यात बेस स्टाईल ट्रिम (Style) आणि लॉरिन अॅण्ड क्लेमेंट  Laurin & Klement (L&K)  यांचा समावेश आहे. ही कार अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम वैशिष्ट्यांसह सज्ज आहे, जी थेट ह्युंदाईच्या Elantra शी स्पर्धा करेल.

| Jun 12, 2021, 12:36 PM IST
1/6

या कारमध्ये 2.0 लिटर टीएसआय (टर्बो) पेट्रोल इंजिन आहे, जी 190 पीएसची पॉवर देते. 7-स्पीड डीएसजी स्वयंचलितट्रान्समिशनसह सुसज्ज या कारचे इंजिन 1500 ते 3990 आरपीएम वर 320 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे मायलेजच्या बाबतीत विचार केला तर ही कार एका लिटर पेट्रोलमध्ये 15.81 किमी पर्यंत धावू शकते.

2/6

3/6

खासबाब म्हणजे ही 5 सीटर कार आहे. परंतु सेफ्टी लक्षात घेऊन कंपनीने 8 एअरबॅगसह थकवा अलर्ट आणि एएफएस म्हणजेच फ्रेंडली फ्रंट लाइट सिस्टम यासारखी वैशिष्ट्ये कारमध्ये दिली आहेत. याशिवाय यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक नियंत्रण आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आहे.

4/6

ही कार 'MySKODA Connect' सारख्या वैशिष्ट्यांसह सज्ज आहे. यासह, आवश्यक असल्यास आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळू शकेल. कार मालक नसतानाही ही कार सुरक्षा Geo fence आणि Time fence) सुनिश्चित करते. यात 25.4 सेमी एलसीडी इन्फोटेनमेंट डिस्प्ले आहे.  

5/6

इतकेच नाही तर या स्कोडा कारमध्ये तुम्हाला हँड्स फ्री पार्किंग, क्रूझ कंट्रोल, स्मार्टफोन वायरलेस चार्जर, 11 स्पीकर्स आणि सब वूफर (610 डब्ल्यू), रीअर व्यू कॅमेरा, बोर्डिंग स्पॉट दिवा अशी बरेच फीचर्स आहेत.

6/6

स्कोडा ऑक्टाव्हिया 2021 स्टाईल व्हेरिएंटची प्रारंभिक एक्स शोरूम किंमत 25.99 लाख रुपये निश्चित केली आहे. तर लॉरिन अँड क्लेमेंटची एक्स-शोरूम किंमत 28.99 लाख रुपये असेल. ( सौजन्य : सर्व फोटो स्कोडा ऑटो )