केसांच्या पुर्नवाढीसाठी ५ नैसर्गिक उपाय....

Feb 21, 2018, 20:52 PM IST
1/5

5 Natural Ways to Grow Hair again in hindi

5 Natural Ways to Grow Hair again in hindi

केसांच्या समस्यांमुळे अनेक लोक हैराण आहे. अनेकदा तर काळजी घेऊनही या समस्या दूर होत नाहीत. अनेकांचे तर केस गळल्यानंतर पुन्हा वाढत नाहीत. मात्र केसांच्या समस्या दूर करण्यासाठी अनेक प्रॉडक्स बाजारात उपलब्ध आहेत. तर सर्जनीने देखील पुन्हा केस येण्यास मदत होईल. मात्र केस पुन्हा वाढण्यासाठी काही नैसर्गिक उपायही आहेत. पाहुया ते कोणते आहेत ते....

2/5

5 Natural Ways to Grow Hair again in hindi

5 Natural Ways to Grow Hair again in hindi

डोक्यावर पुन्हा केस येण्यासाठी अॅन्टी ऑक्सीडेंटचा वापर करा. यासाठी ग्रीन टी च्या दोन बॅग एक कप पाण्यात मिसळा आणि ते मिश्रण डोक्यावर लावा. एका तासाने केस धुवा. ग्रीन टीमधील अॅन्टी ऑक्सीडेंटमुळे केसगळती थांबून केस पुन्हा येण्यास मदत होते.

3/5

5 Natural Ways to Grow Hair again in hindi

5 Natural Ways to Grow Hair again in hindi

केस पुन्हा येण्यासाठी गरम तेलाने मसाज करणे अत्यंत फायदेशीर ठरते. ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल, बदाम तेल हलके गरम करा आणि हलक्या हाताने हळूवार डोक्याला मसाज करा. चार तासांनंतर केस धुवा.

4/5

5 Natural Ways to Grow Hair again in hindi

5 Natural Ways to Grow Hair again in hindi

कडीलिंबू, कोरफड केसांसाठी हेल्दी पर्याय आहेत. कडीलिंबात जीवाणू विरोधात गुणधर्म असतात. त्यामुळे केसांच्या पुर्नवाढीस चालना मिळते. केसगळती थांबवण्यासाठी कोरफड जेलाचा वापर करा. 

5/5

5 Natural Ways to Grow Hair again in hindi

5 Natural Ways to Grow Hair again in hindi

केसांच्या वाढीसाठी प्रोटीन्स गरजेचे असतात. योग्य प्रमाणात प्रोटीन्स घेतल्याने केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे केस काळे आणि मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, मांस, डेअरी प्रॉडक्स, मासे यांचा समावेश करा.