PHOTO : अमिताभ, सलमान, रजनीकांत नाही, तर भारतात 42 वर्षांचा अभिनेता घेतो सर्वाधिक फी; एका भूमिकेसाठी 300 कोटींचं मानधन

'या' अभिनेत्याने भारतातील दिग्गज स्टार्सना मागे सर्वाधिक मानधन घेणारा ठरलाय. अमिताभ बच्चन, रजनीकांत, कमल हासन किंवा प्रभास हे तर सोडाच. या अभिनेत्याने फीच्या बाबतीत तीन खान म्हणजेच सलमान, आमिर आणि शाहरुख खान यांनाही मागे टाकलंय. कोण आहे तो अभिनेता पाहूयात. 

नेहा चौधरी | Nov 22, 2024, 15:06 PM IST
1/7

गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटाचे बजेट हे 100 कोटींवरून 300-400 आणि अगदी 500 कोटींवर गेल्याच पाहिला मिळतंय. अशात अभिनेता आणि अभिनेत्री यांचंही मानधन हे  10-20 पटीने वाढलंय. भारतात सर्वाधिक मानधन घेणारा 42 वर्षीय अभिनेता म्हणून त्याला ओळखलं जातंय. त्याने एका चित्रपटासाठी तब्बल 300 कोटी मानधन घेतलंय.     

2/7

आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलतोय, त्याच्या आगामी चित्रपटाची सर्वत्र चर्चा असून लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळे आतुरतेने चित्रपटाची वाट पाहत आहेत. आम्ही बोलत आहोत, पुष्पा स्टार अल्लू अर्जुन या अभिनेत्याबद्दल.   

3/7

ट्रॅक टॉलिवूडने दिलेल्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुनने त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2: द रुल'साठी 300 कोटी रुपये इतकी मोठी फी आकारलीय.  या मानधनासह अल्लू अर्जुन हा भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरलाय. 

4/7

एवढंच नाही तर अल्लू अर्जुन याने सुपरस्टार रजनीकांतला मागे टाकलंय. रजनीकांत यांनी जेलर चित्रपटासाठी 250 कोटी मानधन घेतलं होतं. तर अभिनेता विजयनेही लिओ चित्रपटासाठी तेवढंच मानधन घेतलं होतं.   

5/7

बॉलिवूडबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खान आणि सलमान खान यांनी 150-200 कोटी रुपये मानधन घेतलंय. ज्यामध्ये त्यांच्या नफ्याचाही समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, आमिर खानने 2017 मध्ये दंगलसाठी 230 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावले होते. 

6/7

तरदुसरीकडे अल्लू अर्जुनने पुष्पा 2 साठी 300 कोटींचं मानधन घेतल्याच्या चर्चेवर नेटकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलंय. व्यापार विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, त्याने देखील चित्रपटात नफ्यात वाटा उचलला असावा. ज्यानंतर काही लोक असा अंदाज लावत आहेत की जर 'पुष्पा 2' 1000 कोटींची कमाई करून ब्लॉकबस्टर बनण्यात यशस्वी झाला. तर अभिनेत्याची कमाई 250-300 कोटींच्या दरम्यान कमाई करु शकतो. 

7/7

सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2 द रुल' बद्दल सांगायचं तर, पुष्पा 2 हा 2021 मध्ये रिलीज झालेल्या पॅन इंडिया पुष्पा: द राइजचा सिक्वेल आहे. 'श्रीवल्ली' आणि 'शेखावत'च्या भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, फहाद फासिलसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट भारतात 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.