महाराष्ट्रातील 400 वर्ष जुना रतनगड; अप्रतिम निसर्ग सौंदर्याने वेढलेला किल्ला, इथं गेल्यावर बाहेर पडण अवघड

रतनगड किल्ला परिसरातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहून सगळं विसरालं. 

| May 28, 2024, 21:53 PM IST

Ratangad Fort Ahmednagar : नाशिक, अहमदनगर हे निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हे आहेत. या जिल्ह्यात अनेक किल्ले देखील आहेत. यापैकीच एक आहे रतनगड (ratangad) किल्ला.   राकट किल्ला अशी या किल्ल्याची ओळख आहे.  रतनगड किल्ला परिसरातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पहायला मिळते. यामुळे इथून पर्यटकांचा परत जावंस वाटत नाही. 

1/7

 गड किल्ले हे महाराष्ट्राच्या वैभशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. डोंगर दऱ्यात बांधण्यात आलेल्या गड किल्ल्यांच्या आसपासचे सौंदर्य मन मोहून टाकते. रतनगड हा यापैकीच एक किल्ला आहे. 

2/7

भंडारदऱ्यापासून 23 किमी, पुण्यापासून 183 किमी आणि मुंबईपासून 197 किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात हा प्राचीन किल्ला आहे. 

3/7

 रत्ना देवीची गुहा, हनुमान दरवाजा , कडेलोट पॉइंट, अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तळे ह या गडावरील पहाण्यासराखी ठिकाणे आहेत.     

4/7

रतनगड आणि खुट्टा सुळका यांच्या मधून गडावर जाण्याची वाट आहे. या वाटेने गडावर जातांना 50 ते 60 कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. या मार्गे गडावर पोहोचण्यासाठी दोन तास लागतात.   

5/7

रतनवाडी गावावरुन या किल्ल्याला रतनगड हे नाव पडले. रतनवाडीतच गडाच्या पायथ्याशी अमृतेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे.   

6/7

एकीकडे घनदाट जंगल आणि दुसरीकडे भंडारदर्‍याचा विस्तीर्ण जलाशय अशा निसर्गरम्य परिसरता रतनगड किल्ला आहे.   

7/7

नाशिक जिल्ह्यात घनचक्कर रांगेत, प्रवरा नदीचा उगमस्थानावर हा 400 वर्ष जुना रतनगड किल्ला वसलेला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आवडता किल्ला असल्याचे संशोधक सांगतात.