बाबोओ... 23 वर्षीय मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतली एवढी मोठी कार! किंमत पाहून व्हाल गार

Marathi Actress Instagram Post Viral: 'माझं नव प्रेम' असं म्हणत या अभिनेत्रीने पोस्ट केलेले फोटो सध्या चांगलेच चर्चेत असून या फोटोंवर हजारोंच्या संख्येनं लाईक्स अन् शेकडोच्या संख्येनं कमेंट्स दिसत आहेत. ही अभिनेत्री कोण आहे तिने फोटो शेअर करत काय म्हटलंय पाहूयात...

Swapnil Ghangale | Jul 29, 2024, 08:48 AM IST
1/9

Rinku Rajguru Instagram

या मराठी अभिनेत्रीचा 'कार'नामा पाहून सेलिब्रिटींनाही तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला आहे. जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री आणि तिने कोणती कार घेतलीय...

2/9

Rinku Rajguru Instagram

'सैराट'च्या माध्यमातून महाराष्ट्रतल्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर फार सक्रीय आहे.   

3/9

Rinku Rajguru Instagram

खरं तर 'सैराट'नंतरही रिंकून अनेक चित्रपट केले मात्र आजही ती याच चित्रपटासाठी ओळखली जाते.   

4/9

Rinku Rajguru Instagram

23 वर्षीय रिंकूची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती तिने केलेल्या महागड्या शॉपिंगबद्दल. आता ही शॉपिंग साधीसुधी नाही. तर रिंकूने थेट मोठी कारच विकत घेतली आहे.  

5/9

Rinku Rajguru Instagram

रिंकूने स्वत: इन्स्टाग्रामवरुन गाडीसोबतचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. "पहिली गोष्ट ही कायम खासच असते," असं म्हणत तिने कारसोबतचे फोटो शेअर केलेत.

6/9

Rinku Rajguru Instagram

"जेव्हा तुम्ही स्वत:ची पहिली कार खरेदी करता तेव्हा जे काही वाटते ते फारच खास असतं," असंही रिंकूने म्हटलं आहे.

7/9

Rinku Rajguru Instagram

"हे माझं नवं प्रेम असेल," असं म्हणत रिंकूने तीन फोटो शेअर केले आहेत.

8/9

Rinku Rajguru Instagram

रिंकूने घेतलेली कार ही 'टाटा'ची 'हॅरिअर' ही कार आहे. या कारची किंमत 14 लाख 99 हजारांपासून सुरु होते. टॉप एण्ड मॉडेल 26 लाख 44 हजारांना आहे. रिंकूने नेमकं कोणतं मॉडेल घेतलं हे स्पष्ट झालेलं नाही. 

9/9

Rinku Rajguru Instagram

'सैराट' फेम 23 वर्षीय अभिनेत्रीची ही पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत असून अनेक सेलिब्रिटींनी त्यावर कमेंटही करुन तिचं अभिनंदनही केलं आहे.