PHOTO : 11 अफेअर, तरी अविवाहित, मात्र 24 व्या वर्षी झाली आई, 47 वर्षांच्या हॉट अभिनेत्रीला सलमान खानसोबत नव्हतं करायचं काम

Entertainment : फोटोमधील ही हॉट अभिनेत्रीचे आतापर्यंत 11 अफेयर झाले, तरीदेखील वयाच्या 47 व्या वर्षी ही हॉट अभिनेत्री अविवाहित आहे. पण ती लग्नाशिवाय 24 व्या वर्षी आई झाली.   

Apr 14, 2024, 15:36 PM IST
1/8

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या अभिनेत्रीला सलमान खानसोबत काम करायच नव्हतं. एवढंच नाही तर सलमान आणि अभिनेत्री एकमेकांना बिलुकल पसंत करत नव्हते. 

2/8

सलमान खानने एका मुलाखतीत सांगितलं की, ज्यावेळी तो पहिल्यांदा या अभिनेत्रीला भेटला ती अतिशय असभ्य वागली होती. 

3/8

सलमान खान ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती आहे, सुष्मिता सेन. त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा असा होता की, 'बीवी नंबर 1'च्या सेटवर जेव्हा सलमान दोन तास उशिरा पोहोचला आणि तो सुष्मिताला भेटायला गेला. तर तिने त्याच्याशी रुड वागली. तर सलमान खानपेक्षा सुष्मिता उंच असल्याने तिला त्याच्यासोबत काम करायचं नव्हतं. 

4/8

पण नंतर त्यांच्यामध्ये चांगली मैत्रीही झाली. सलमानने पुढे सांगितलं की, सुष्मितामधील एक गोष्ट त्याला खूप आवडते. तिचं हृदय खूप मोठं आहे. 

5/8

एकदा 'बीवी नंबर 1'च्या शुटिंग दरम्यान ते मियामीमध्ये असताना सुष्मिताने लिमोजिन किरायाने घेतली होती. यामध्ये ती सेटवरील सर्व स्टाफला घेऊन एका नाईट क्लबमध्ये गेली. तिथे सगळ्यात उत्तम शॅम्पेन आणि छान जेवण ऑर्डर केलं. तिच्या या कृतीमुळे सर्व स्टाफ खूप खूष होता. 

6/8

तर सुष्मिताच्या अफेयरबद्दल बोलायचं झालं तर प्रसिद्ध अभिनेता, उद्योगपती आणि मॉडेलला तिने डेट केलं. ललित मोदी, संजय नारंग, रणदीप हुड्डा, इम्तियाज खत्री, वसीम अक्रम आणि मुदस्सर अजीज यांना तिने डेट केलं. पण तिच्या आयुष्यात खरा साथीदार तिला अजून गवसला नाही. एका मीडिया रिपोर्टनुसार अनिल अंबानींसोबतही तिचं नाव जोडल्या गेलं होतं. 

7/8

लग्न न करता ती आई झाली. तिने दोन मुलींना दत्तक घेतलं. पहिल्या मुलींच्या आजारपणासाठी तिने अक्षय कुमारचा ऐतराज चित्रपट सोडला होता. 

8/8

आज मुलं मोठी झाल्यावर तिने ओटीपीवर दमदार एन्ट्री घेतली आहे. 'ताली' आणि 'आर्या 3' मधील त्याच्या अभिनयाने तिने पुन्हा चाहत्यांच्या मनात घर केलं.