11 अफेअर, लग्नाशिवाय 24 व्या वर्षी बनली आई, आज 48 व्या वर्षी 15 वर्ष लहान Ex बॉयफ्रेंडसोबत पुन्हा पॅचअप?

Entertainment : ही अभिनेत्री तिच्या करिअरपेक्षा लव्ह लाइफमुळे कायम चर्चेत असते. वयाच्या 48 व्या वर्षी तिने लग्न न करण्याच कारण सांगितलंय. तर 15 वर्ष लहान Ex बॉयफ्रेंडसोबत तिने पुन्हा पॅचअप केलंय. 

नेहा चौधरी | Jul 21, 2024, 16:10 PM IST
1/8

काहीच दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीने 15 वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअपची घोषणा केली होती. पण गेल्या काही दिवसांमध्ये हे दोघे परत एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये पॅचअप झाल्याची चर्चा सुरु आहे. 

2/8

आम्ही बोलत आहोत सुष्मिता सेन हिचाबद्दल. नुकताच एका कार्यक्रमात सुष्मिता एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत स्पॉट झाली. एका इव्हेंटमध्ये दोघे एकत्र दिसले. शिवाय रोहमन ज्या प्रकारे तिची काळजी घेत होता. ते पाहून नेटकऱ्यांनी विचारलंय की, तुमचं पॅचअप झालं का?

3/8

सुष्मिता सेन अलीकडेच रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. यावेळी त्यांनी स्वतःबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिच्या लव्ह लाईफबद्दल विचारल्यावर अभिनेत्री म्हणाली की, 'मी गेल्या दोन वर्षांपासून सिंगल आहे किंवा 2021 पासून मी कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाही. माझ्या आयुष्यात असे अनेक अद्भुत लोक आहेत जे माझे मित्र आहेत.'

4/8

तरदुसरीकडे वयाच्या 48 वर्षी अभिनेत्रीने लग्न करण्याच कारण अखेर सांगितलंय. ती म्हणाली की, मोठी मुलगी रेनी हिच्यामुळे मी लग्न न करण्याच निर्णय घेतला आहे. 

5/8

सुष्मिता सेनने 2000 मध्ये तिची मोठी मुलगी रेनीला दत्तक घेतले. अभिनेत्री तिच्या कारकिर्दीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बी-टाऊनमध्ये कोणाशी तरी डेटिंग करत असल्याचा बातम्या समोर आल्यात. मात्र, तिने कधीही कोणत्याही बातमीला दुजोरा दिला नाही. 

6/8

सुष्मिताने सांगितलं की, तिने लग्नाबद्दल तिची मोठी मुलगी रेनीच मत जाणून घेतलं. तर त्यावर ती म्हणाली की, 'नाही, अजिबात नाही. लग्न करण्याची काय गरज आहे? या व्यक्तीसोबत नाही, त्या व्यक्तीसोबत नाही, कोणत्याही व्यक्तीसोबत नाही. लग्न करू नको; कारण? तू खूप चांगला आहेस.'

7/8

रेनीनंतर सुष्मिताने 2010 मध्ये तिची दुसरी मुलगी अलिसा हिला दत्तक घेतलं. अभिनेत्री अनेकदा तिच्या तीन जणांच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पण काही प्रसंगी, जसे की स्पोर्टस डे जेव्हा इतर मुलं त्यांच्या वडिलांसोबत येतात, तेव्हा तिच्या मुलींना आयुष्यात वडिलांची कमी जाणवते. असे असूनही, सुष्मिता त्या स्पोर्टस डेला जायची आणि अनेकदा जिंकायची, ज्यामुळे तिला आनंद मिळायचा.

8/8

सुष्मिता सेन नाव हे ललित मोदी, संजय नारंग, रणदीप हुड्डा, इम्तियाज खत्री, वसीम अक्रम, मुदस्सर अजीज यांच्यासह 11 जणांसोबत जोडलं गेलं. पण याबद्दल अभिनेत्री कधीही बोलली नाही.