मरगळलेल्या शरीरात 100च्या स्पीडने धावेल रक्त, पुरुषांच्या मर्दानगीला मिळेल आधार, 10 भाज्या न चुकता खा
Protein Rich Food : प्रोटीनची कमतरता आपल्या शरीराला आतून पोखरून टाकते. जर तुम्ही चिकन, मटण किंवा अंड खात नसाल तर या 10 भाज्यांच्या मदतीने मिळवा प्रोटीन. पुरुषांची ताकद दुप्पटीने वाढेल
केसांपासून स्नायूंपर्यंत शरीराच्या प्रत्येक भागासाठी प्रथिने आवश्यक असतात. हे पोषक तत्व शरीराच्या विकासासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी कार्य करते. प्रथिने स्नायू, त्वचा, केस, नखे, एन्झाईम्स, हार्मोन्स आणि रोगप्रतिकार प्रणाली तयार आणि दुरुस्त करण्यासाठी उपयुक्त आहेत.
प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायूंचा आकार कमी होतो आणि स्नायूंची ताकद कमी होते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे कोरडी त्वचा, केस गळणे आणि ठिसूळ नखे होऊ शकतात. त्याची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकते, ज्यामुळे संक्रमणाचा धोका वाढू शकतो. त्याच्या कमतरतेमुळे शरीराला थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायूंचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते.
(फोटो सौजन्य - iStock)