लॉकडाऊनमध्येही सुवर्णझळाळी कायम; ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल

लॉकडाऊनमुळे सोन्याच्या खरेदीत ऑनलाइन पद्धतीने वाढ झाली असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

Updated: May 4, 2021, 11:19 AM IST
लॉकडाऊनमध्येही सुवर्णझळाळी कायम; ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल title=
representative image

वाल्मिक जोशी, झीमीडिया, जळगांव : कोरोनामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जळगावातील सुवर्णबाजार ठप्प झालेला आहे. तरी देखील कोरोना काळात जागतिक स्तरावर सोन्याच्या एकूण मागणीत घट होताना सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. लॉकडाऊनमुळे सोन्याच्या खरेदीत ऑनलाइन पद्धतीने वाढ झाली असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

कोरोनामुळे सुवर्णबाजार बंद असले तरी सोने खरेदीत चांगलीच वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे सुवर्ण बाजारपेठा जरी बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने सोन्याचा व्यवसाय हा वाढलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून फक्त सोने खरेदी कडे बघितले जाते आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने सोन्याची बिस्किटे, सोन्याची नाणी, तसेच इतर रूपांमध्ये ऑनलाइन पद्धतीने मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून सोने खरेदी केली जात आहे. 

सोन्याकडे गुंतवणूक म्हणून बघण्याचा दृष्टिकोन सध्या वाढला आहे. सोन्यामध्ये  सुरक्षित गुंतवणूक असून म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये पैसा न गुंतवता सोन्यात गुंतवणूक करण्यात लोकांचा जास्त कल आहे. १ एप्रिल रोजी सोन्याचे भाव आहे 45 हजार रुपये प्रति तोळे होते परंतु आता सोन्याचे भाव 48 हजार 200 रुपये असे झाले आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने सोन्याच्या मागणीत सध्या वाढ झाली असल्याचे मत सुवर्ण व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.