अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास माझा विरोध नाही- भुजबळ

प्रत्येकाला वाटत होते छगन भुजबळ संपले. आता त्यांचं काही खरं नाही.

Updated: Dec 9, 2019, 12:35 PM IST
अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास माझा विरोध नाही- भुजबळ title=

नाशिक: अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास माझा कोणताही विरोधी नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते सोमवारी नाशिकमधील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, अजित पवार यांनी राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय व्हावे, यासाठी मीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे आता अजित पवारांना कोणते पद द्यायचे याचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील, असे भुजबळ यांनी सांगितले. 

यावेळी भुजबळ यांनी अडचणीच्या काळात मदत केल्याबद्दल शरद पवार यांचे आभारही मानले. प्रत्येकाला वाटत होते छगन भुजबळ संपले. आता त्यांचं काही खरं नाही. मात्र, शरद पवार आणि जनतेच्या आशीवार्दाने मी पुन्हा उभा राहिलो. यानंतर आता पुन्हा एकदा नव्या राजकीय इनिंगला सुरुवात करत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

आम्ही कोणाचेही कायमचे दुश्मन नाही- अजित पवार

या पत्रकारपरिषदेत भुजबळ यांनी भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्यासंदर्भातही भाष्य केले. खडसे जे बोलत आहेत, त्यामध्ये तथ्य आहे. राजकारणात पुढचं पाऊल कुठे ठेवावं, याची त्यांना जाणीव आहे. मात्र, त्यांनी शरद पवार किंवा माझी भेट घेतली म्हणजे ते लगेच राष्ट्रवादीत येतील, असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

मोठी बातमी: एकनाथ खडसेंच्या नाराजीची अखेर केंद्रीय नेतृत्वाकडून दखल; आज दिल्लीत जाणार

भुजबळ यांनी २८ नोव्हेंबरला शिवतीर्थावर मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आगामी काळात ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता आहे.