प्रशांत जाधव, संपादक, www.24taas.com
एक वेळ अशी होती की जगभरातील मोबाईल फोन बाजारावर फिनलँडची कंपनी नोकियाचे वर्चस्व होते. भारतीय बाजारात आणि जनसामान्यांमध्येही नोकियाचा बोलबाला होता. कपाट म्हणजे गोदरेजचे, मोठे चॉकलेट म्हणजे कॅटबरी असे काहीसे समीकरण काही वर्षापूर्वी मोबाईल म्हणजे नोकिया असे झाले होते.
पण, गेल्या काही वर्षात एकाहून एक अपग्रेडेड स्मार्टफोन आले आणि नोकियाचे लौकिक लोप पावला आणि आता इतर कंपन्याप्रमाणे नोकिया एक साधारण कंपनी बनली आहे. भारतात आणि जगभरात स्वतःतील चायना मोबाईलने कमी उत्पन्न असलेल्या सामन्य माणसाच्या घरात आपली जागा बनवली. तर सॅमसंग, ब्लॅकबेरी, आयफोन, आयटीसी या सारख्या स्मार्ट फोन उच्चभ्रूंच्या गळ्यातील ताईत बनले. त्यामुळे नोकिया जो सर्वांचा फेवरेट होता, तो कुठेतरी या रेसमध्ये मागे पडला. श्रीमंत ग्राहकांसाठी नवे तंत्रज्ञान आणि सामान्य ग्राहकांसाठी परवडणारा फोन असे काही बदल नोकियाने मोठ्याप्रमाणात अमलात आणले नाही. त्यामुळे नोकियांच्या फोनची विक्री मोठ्या प्रमाणात घटू लागली. कंपनीच्या हालाखीच्या परिस्थितीचा परिणाम सरळ-सरळ कर्मचाऱ्यांवर पडला आणि आता हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड येण्याची शक्यता आहे. या कंपनीने केवळ आपल्या कर्मचाऱ्यांना फटका दिला नाही, तर फिनलँड सारख्या एका प्रगत देशाची अर्थव्यवस्था डगमगली आहे.
फिनलँडचे पंतप्रधान जिर्की केटइनेन यांनी देशाच्या बिघडत्या स्थिती बद्दल चिंता व्यक्त केली आहे. नोकियाने फिनलँडच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक भूमिका बजावली असल्याचेही त्यांनी कबुल केले. त्यामुळे नोकिया हे फिनलँडसाठी किती महत्वाची आहे, हे पंतप्रधानांच्या वक्तव्याने सूचित झाले.
नोकियाने फिनलँडच्या देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) सन २००० मध्ये चार टक्क्यांचे योगदान केले होते.परंतु त्याच नोकियाचे गेल्या वर्षी २०११मधील जीडीपीतील योगदान कमी होऊन केवळ अर्ध्या टक्क्यावर आले आहे. नोकियाने पैसा जमा करण्यासाठी आपल्या मुख्यालय विकण्याची योजना नुकतीच जाहीर केली आहे.
नोकियाचा बाजारातील लौकीक कमी झाल्याचा फायदा चीन घेणार नाही तर त्याला चीन म्हणता येणार नाही. चीनची आघाडीची टेलिकॉम कंपनी हुवेईने नवीन शोध आणि विकास केंद्र स्थापन करणार असल्याचे जाहीर करून टाकले. त्यामुळे नोकियाच्या संकटात अजूनही वाढ होणार आहे.
नोकऱ्या जाणार
नोकियाच्या खराब स्थितीचा सरळ-सरळ फटका हा त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे. जगभरातील नोकियांच्या कर्मचाऱ्यांमधून सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. हेलसिंकी येथे आयोजित एका कॉन्फरन्समध्ये नोकियाने या कठोर निर्णयाची घोषणा केली.
यातील ३७०० जण एक एकट्या फिनलँडमधून असणार आहे. ही संख्या फिनलँडमधील नोकियाच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या ४० टक्के आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये नोकियाने ज्यांना काढून टाकणार आहे, अशा चांगल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वयंरोजगाराच्या प्रशिक्षणासाठी प्रेरित करण्यात आले. त्यासाठी काही प्रमाणात वित्तीय साहाय्यही करण्यात आले.
फिनलँडमधील नोकियाचे २२० माजी कर्मचारी आतापर्यंत आपआपला व्यवसाय करू लागले आहे. नोकियातील कर्मचाऱ्यांसह अधिकारीही आपली नवीन वाट शोधत आहे. नोकियातील सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क डिलन तब्बल दहा वर्षाच्या सेवेनंतर जोला मोबाईल या कंपनीत रुजू झाले आहे.
फिनलँडचे भविष्य काय
हेलसिंकी येथे आयोजित स्लश कॉन्फरन्समध्ये फिनलँडच्या भविष्याबद्दल चर्चा झाली आणि त्याला एक वेगळे रुप देण्याचा विचार करण्यात आला. यावेळी ५०० कंपन्या आणि सुमारे २०० गुंतवणूकदार उपस्थित होते. त्यांना फिनलँडमध्ये खूप काही करण्याची इच्छा आहे.
यावेळी फिनलँडच्या दृष्टीने सुखद गोष्ट म्हणजे रोवियो या कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी यांनी सकारात्मक दृष्टीकोन दाखवत फिनलँडमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी पोषक वातावरण आहे. एंग्री बर्ड हे हॉलीवुड कॅलिफोर्नियाची देणगी नाही तर फिनलँडमध्ये ही निर्माण झाले आहे.
त्यामुळे आता नोकियामुळे मंदीच्या गर्तेत पोहचलेल्या फिनलँडची स्थिती या न