नऊ वर्षांचा आशिष गोयल रात्री सायकल चालवत होता. पोहोणं, घोडेस्वारी, टेनिस, क्रिकेट अशा अनेक गोष्टींसारखाच सायकल चालवणं हा ही त्याचा छंद. भोवताली अंधार दाटून येत होता. अचानक डोळ्यांसमोर काही दिसेनासं झाल्यामुळे तो धडपडला. घरी या गोष्टीबद्दल सांगावं इतकं त्याला ते गंभीर वाटलं नाही. पण, त्यावेळी गंभीर न वाटलेला तो अंधार त्याला कायमचा चिकटला... डॉक्टरांनी निदान केलं- ‘रेटिनायटेस पिग्मेंटोजा’... एक असा आजार ज्यामुळे आशिष आपली दृष्टी कायमची गमावून बसला. या आजारावर अजूनही वैद्यकशास्त्राला इलाज सापडलेला नाही.
आपल्या लाडक्या आंद्रे आगासी सारखं टेनिसपटू बनण्याचं त्याच्या नजरेतलं स्वप्न त्याच्या नजरेबरोबरच अप्राप्य बनून गेलं. पण, आशिषने हार मानली नाही. त्याने अभ्यासावर सर्व लक्ष केंद्रित केलं. पुढे जाऊन एन. एम. इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमध्ये तो दुसरा आला. कॉलेजमध्ये ‘बेस्ट स्टुडंट’ चा पुरस्कारही मिळवला. पण, कॅंपस इंटरव्ह्यूंमध्ये मात्र नोकरी मिळवताना त्याच्या अंधत्वामुळे अनेक संस्थांनी त्याच्या शैक्षणिक कर्तृत्त्वाकडे न पहाता आंधळेपणे नकार दिला. सरते शेवटी ING VYSYA बॅंकेने त्याच्या अपंगत्वापेक्षा टॅलेंटला महत्व दिलं. आशिष बंगळुरूला ING VYSYA मध्ये इन्कम ट्रेडर म्हणून काम करू लागला. पुढे तीन वर्षांनी नव्या नोकरीचा शोध घेत असतानाही तीच समस्या भेडसावू लागली. लोक त्याला अंधत्वाच्या कारणामुळे नोकरी देण्यास नकार देत.
याच सुमारास परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा विचार आशिषच्या मनात मूळ धरू लागला. आणि त्याने ‘ग्लोबल फायनान्शल मार्केट’ या विषयाचा अभ्यास करण्यासाठी फिलाडेल्फीयाच्या ‘वॉर्टन’ विद्यापीठाची निवड केली. प्रवेश मिळालाही, पण ही प्रक्रिया काही तितकीशी सोपी नव्हती. एका सर्वस्वी अनोळखी देशात जाऊन शिक्षण घेणं ही खूप कठीण गोष्ट होती. हा अनुभव जसा आशिषसाठी नवा होता, तसाच तो वॉर्टन विद्यापीठासाठीही अनोखा होता. पण, आशिषने पुन्हा आपल्या सकारात्मक विचारांनी, आत्मविश्वासाने आणि जिद्दीने या सर्व अडथळ्यांवर मात केली. वॉर्टन विद्यापीठातून डिग्री घेऊन बाहेर पडलेला पहिला अंध विद्यार्थी ठरला. याचबरोबर तो कॉलेजच्या ‘जोसेफ वॉर्टन’ पुरस्काराचा मानकरीही ठरला.
त्यानंतर आशिष ‘जे. पी. मॉर्गन’ सध्ये काम करु लागला. सध्या तो याच कंपनीच्या लंडन ऑफिसमध्ये ‘मुख्य गुंतवणूक अधिकारी’ म्हणून काम संभाळत आहे. आज त्याच्या हाताखाली १००हून अधिक माणसं काम करत आहेत. अर्थव्यवस्था क्षेत्रात काम करणारा आशिष हा ‘ब्राझिलीयन ड्रमींग ग्रुप’चाही सदस्य आहे. दुर्दैवाने आशिषची बहीण गरीमा हिलादेखील दहावीत असताना याच संकटाशी सामना करावा लागला आणि ती ही दृष्टीही गमावून बसली. पण, आपल्या भावाचा आदर्श समोर ठेवत गरीमानेही शिक्षणाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केलं. आपलं चित्रकार होण्याचं स्वप्न धुळीत मिळाल्यावर गरीमाने लेखन कलेला आपलंसं केलं. सोशल मीडिया कम्युनिकेशनचा अभ्यासही तिने मोठ्या जिद्दीने पूर्ण केला आणि हिंदुस्तान टाईम्सच्या मेट्रो डेस्कवर तीन महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं. रॅपलींग, ट्रेकींग, रिव्हर क्रॉसींग यांसारख्या साहसी खेळांमध्येही तिने हिरीरीने सहभाग घेतला. दुर्दैवाने आशिषची बहीण गरीमा हिलादेखील दहावीत असताना याच संकटाशी सामना करावा लागला आणि ती ही दृष्टीही गमावून बसली. पण, आपल्या भावाचा आदर्श समोर ठेवत गरीमानेही शिक्षणाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केलं. आपलं चित्रकार होण्याचं स्वप्न धुळीत मिळाल्यावर गरीमाने लेखन कलेला आपलंसं केलं.
सोशल मीडिया कम्युनिकेशनचा अभ्यासही तिने मोठ्या जिद्दीने पूर्ण केला आणि हिंदुस्तान टाईम्सच्या मेट्रो डेस्कवर तीन महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं. रॅपलींग, ट्रेकींग, रिव्हर क्रॉसींग यांसारख्या साहसी खेळांमध्य