अमरावतीतली पत्रकारिता

संतोष गोरे 20 ऑक्टोबर 2006 ते 4 डिसेंबर 2007 या जवळपास सव्वा वर्षाच्या काळात मी अमरावतीत पत्रकारिता केली. हैदराबादहून माझी इथं रिपोर्टर आणि ब्युरो चीफ या पदावर बदली ( बदली म्हणजे शिक्षा नव्हे ) करण्यात आली. हैदराबादून फिल्डवर येण्यासाठी मोठं लॉबिंग करावं लागायचं, तसंच कोणत्यातरी गटाचा कपाळावर ( कुंकू नव्हे ) शिक्का मारावा लागायचा.

Updated: Apr 23, 2012, 04:50 PM IST

संतोष गोरे

20 ऑक्टोबर 2006 ते 4 डिसेंबर 2007 या जवळपास सव्वा वर्षाच्या काळात मी अमरावतीत पत्रकारिता केली. हैदराबादहून माझी इथं रिपोर्टर आणि ब्युरो चीफ या पदावर बदली ( बदली म्हणजे शिक्षा नव्हे ) करण्यात आली. हैदराबादून फिल्डवर येण्यासाठी मोठं लॉबिंग करावं लागायचं, तसंच कोणत्यातरी गटाचा कपाळावर ( कुंकू नव्हे ) शिक्का मारावा लागायचा. मात्र या पैकी कोणताही प्रयत्न न करता माझी अमरावतीसाठी निवड झाली होती. याचा माझ्यासह अनेकांना धक्का बसला होता. अर्थात कोणतंही राजकारण न करता, बदल घडवता येतात, हे यातून तेव्हा दिसून आलं. एक प्रकारे डेस्कवर कोणत्याही राजकारणात न राहता अलिप्त राष्ट्रांप्रमाणे आगेकूच करणा-या विचारसरणीचा तो विजय. आता तुम्ही म्हणाल साधी बदली पण काय कौतुक ? आता आपलं कौतुक आपणच करण्याचे हे दिवस आहेत. त्याला काय करणार ?

 

अर्थात मी मागितलं होतं संभाजीनगर, मात्र मला मिळाली अमरावती. असा हा प्रकार घडला होता. नाही तरी जे मागितलं ते मिळण्याऐवजी दुसरंच पदरी पडण्याचा दोषच माझ्या मागे लागला आहे. अर्थात हा दोषही दूर होईलच. थोड्याशा नाराजीनं मी अमरावतीमध्ये प्रवेश केला. वडाळी भागातल्या आमच्या ऑफिसमध्ये मी सकाळी पोहोचलो. तिथं माझी आणि प्रफुल्ल साळुंखेची भेट झाली. कॅमेरामन आशिष यावले, कृष्णा भागबोले आणि मिलिंद वाडे ही आमची तिथली टीम. तर अमरावतीच्या ब्युरोमध्ये माझ्याबरोबर उमेश अलोने, सत्यपाल घाटे, दिनेश पवार, आशिष मलबारी हे रिपोर्टर अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिममध्ये काम रिपोर्टिंग करत होते.

 

 

मी आणि कॅमेरामन आशिष यावले ही जोडीही अफलातून होती. शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीचं दृश्य आम्ही दोघे बरोबर असताना कुणाच्याही डोळ्यासमोर यावं, अशी आमच्या दोघांची उंची

 

 

कोणत्याही एजंटची मदत न घेता आणि डिपॉझिट न देता घरही भाड्यानं मिळालं. संजीवनी कॉलनीत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या आमच्या शेजारी. अँडव्हेकोट अनिल कडू यांचा मी भाडेकरू. तसंच शेजारी असलेल्या राऊत कुटुंबाबरोबरही चांगलाच जिव्हाळा निर्माण झाला होता. अर्थात याचं कारण माझे तेव्हा दोन महिन्यांचा असणारा माझा मुलगा वेद. कडू आणि राऊत कुटुंबात छोटं मुल नसल्यानं वेद चांगलाच लाडोबा झाला होता. घरापासून दूर असलो तरी त्याचं घरच्यासारख कोडकौतुक तिथं सुरू असायचं. त्यामुळे स्टोरीसाठी बाहेरगावी मुक्काम असला तरी पत्नी आणि मुलाची चिंता करावी लागत नव्हती.

 

 

बहुतेक 2006 च्या डिसेंबरमध्ये दर्यापूरची पोटनिवडणुक झाली. प्रचाराच्या काळात मला एका प्रतिस्पर्धी चॅनेलमधील रिपोर्टरचा फोन आला. तुझं पाकीट तयार आहे, ते घेण्यासाठी ये. हा फोन ऐकून मी हारलो, मात्र ही कामं मी करत नाही असं त्याला सांगितलं. तत्कालीन महापौरांनी ही पाकीटं पोचती केली होती. मध्यमवर्गीय कुटुंबातल्या आई - वडिलांनी केलेल्या उच्च संस्कारांपुढे अशी पाकीटं कधीही उभी राहू शकत नाहीत. मात्र या घटनेमुळं राजकीय वर्गात चांगली इमेज निर्माण झाली. ( अर्थात इमेज आधीपासून चांगलीच होती. ) मात्र प्रतिस्पर्धी चॅनेलमधले अनेक सहकारी मेळघाटमध्ये जाऊन तर कुणी अधिका-यांना ब्लॅकमेल करायचे. काहींना तर टोल नाक्यावाले नियमीत हप्ता देत होते, अशाही खबरा कानावर यायच्या.

 

 

मात्र या बजबजपुरीतही मोहन अटाडकर, अविनाश दुधे, सध्या मुंबईत असलेले रघुनाथ पांडे, प्रदीप देशपांडे आणि दिलीप एडतकर या पत्रकार आणि संपादकांचा अभ्यास मनाला भावला. त्यांचा विविध विषयातला अभ्यास नवख्या पत्रकारांना नक्कीच प्रेरक ठरणारा आहे.

 

 

तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम  यांचा यवतमाळमध्ये शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला होता. त्यानंतर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा पहिला जाहीर सत्कार अमरावतीमध्ये झाला होता. असा हा शेवट आणि आरंभ कव्हर करण्याची संधी मला मिळाली. खैरलांजीच्या घटनेचे उमटलेले हिंसक पडसाद कव्हर करताना च

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x