शाओमीचा १६ जीबी स्मार्टफोन स्वस्त झाला

हल्ली स्वस्तातले स्मार्टफोन विक्रीला अधिक प्रतिसाद मिळत असल्याने शाओमी इंडियानेही एमआयफोर आय १६ जीबी स्मार्टफोनची किंमत घटवली आहे. १००० रुपयांनी हा स्मार्टफोन स्वस्त झाला असून बुधवारपासून हा स्मार्टफोन ११ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध होईल. 

Updated: Nov 18, 2015, 04:58 PM IST
शाओमीचा १६ जीबी स्मार्टफोन स्वस्त झाला title=

नवी दिल्ली : हल्ली स्वस्तातले स्मार्टफोन विक्रीला अधिक प्रतिसाद मिळत असल्याने शाओमी इंडियानेही एमआयफोर आय १६ जीबी स्मार्टफोनची किंमत घटवली आहे. १००० रुपयांनी हा स्मार्टफोन स्वस्त झाला असून बुधवारपासून हा स्मार्टफोन ११ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध होईल. 

यापूर्वी, दिवाळीमध्ये कंपनीने मर्यादित कालावधीसाठी या स्मार्टफोनवर डिस्काउंट दिला होता. ३२ जीबी स्मार्टफोनच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा स्मार्टफोन १४ हजार ९०० रुपयांनाच उपलब्ध आहे. 

सुरुवातीला शाओमीने एमआयफोरआय स्मार्टफोन १२ हजार ९९९ रुपयांत लाँच केला होता. यामध्ये पाच इंचाचा डिस्प्ले, अँड्रॉईड ५.० लॉलीपॉप, ओक्टाकोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, दोन जीबी रॅम, १३ मेगापिक्सेल रेयर आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा हे फीचर्स आहेत.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.