नवी दिल्ली: चीन आणि भारतात खूप लोकप्रिय ठरलेली कंपनी श्याओमीनं आपला Mi4i स्मार्टफोनचं नवं वॅरिएंट लॉन्च केलंय.
३२ जीबी असलेल्या या स्मार्टफोनची किंमत १४,९९९ रुपये आहे. या नव्या मॉडेलची विक्री २८ जुलै दुपारी २ वाजतापासून सुरू होईल. यासोबतच कंपनी आपली भारतातील अॅनिव्हर्सरी साजरी करतेय.
श्याओमीनं काही दिवसांपूर्वी आपल्या फेसबुक पेजवर एक फोटो शेअर करून स्पष्ट केलं होतं की, ते नवा ३२ जीबी वॅरिएंट लवकरच लॉन्च करणार आहे.
आज २२ जुलैला श्याओमीनं भारतात एक वर्ष पूर्ण केलंय. अशात कंपनीनं आपला मोस्ट अवेटेड ३२ जीबी वॅरिएंट लॉन्च केलंय.
फोनचे फीचर्स -
- Mi4i मध्ये ५ इंच फुल एचडी डिस्प्ले आहे. ज्याचं पिक्सेल रिझॉल्यूशन १०८०x१९२० आहे.
- अँड्रॉईड ५.० लॉलिपॉप बेस्ड MIUI6 असेल. याचं प्रोसेसर ६४ बिट ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ६१५
- ४०५ जीबीयू , २ जीबी रॅम
- इंटरनल मेमरी ३२ जीबी सोबतच मायक्रो एसडी कार्ड वाढवला जावू शकेल.
- बॅटरी 3120mAh, क्विक चार्जिंग १ तासांत ४० टक्के बॅटरी चार्ज होणार. तीन तासांत पूर्ण बॅटरी चार्ज होईल.
- १३ मेगापिक्सेल कॅमेरा सोबत f/2.0 लेंस अपार्चर, ५ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा
- Mi4i हा स्मार्टफोन Mi4 पेक्षा १२ टक्के पातळ आणि १३ टक्के वजनाला हलका असेल. ७.८ mm पातळ आणि वजन १३० ग्राम आहे.
- हा ४जी सपोर्टिव्ह आहे.
- फोन सहा भारतीय भाषांना हिंदी, बांग्ला, कानडी, तेलुगू, मल्याळम आणि तमिळला सपोर्ट करेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.