जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फक्त २५१ रुपयात

रिंगिंग बेल्सचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 17, 2016, 12:43 PM IST
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फक्त २५१ रुपयात title=

मुंबई : भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी रिंगिंग बेल्स सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची किंमत २५१ रुपये आहे. 

केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर या स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१चे लाँचिंग करणार आहेत. जगातील सर्वात स्वस्त असा हा स्मार्टफोन आहे.

४ इंचची डिस्प्ले, १.३ गीगाहर्ट्ज कोअर प्रोसेसर, १ जीबी रॅम, ८ जीबी टोटल स्टोरेज स्पेस, ३.२ मेगापिक्सल कॅमेरा आणि १४५० एमएएच बॅटरी ही या फोनची वैशिष्ट्ये आहे. १८ फेब्रुवारीपासून या फोनची बुकिंग सुरू होणार आहे. या फोनचे नाव फ्रीडम २५१ आहे.