मुंबई : हल्ली सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टी सहजपणे व्हायरल होतात. फेसबुक, व्हॉट्सअॅपवर कोणतीही गोष्ट टाकायची खोटी ती लगेच पसरते. हल्लीची पिढी तर या सोशल साईट्सवर २४ तास ऑनलाईन असते.
मग कोणाच्या ना कोणाच्या प्रोफाईलला भेट देणे हे सर्रासपणे केले जाते. कोणी कोणता फोटो शेअर केलाय. त्याचे स्टेट्स काय हे त्याच्या प्रोफाईलवर जाऊन पाहिले जाते. सुरुवातीला आपल्या फेसबुक प्रोफाईलला कोणी भेट दिली हे समजायचे नाही. मात्र आता ते शक्य आहे.
१. सुरुवतीला फेसबुकला लॉगइन करा
२. टाईमलाईनवर राईट क्लिक करुन "view page source" ला सिलेक्ट करा
३. या पेजवर तुम्हाला खूप सारे को़ड दिसतील
४. त्यानंतर CTRL + F हे बटण दाबा
५. तेथे सर्च फिल्डमध्ये FriendsList हे त्या बॉक्समध्ये टाईप करा.
६. नंबरची लिस्ट येईल
७ यातला नंबर कॉपी करून पुन्हा तुमच्या फेसबूर प्रोफाईलवर जा आणि कॉपी केलेला नंबर पेस्ट केरा
८ यात ज्या मित्र-मैत्रिणींनी आपल्या प्रोफाईलला भेट दिलीये त्यांचे आयडी येतील.