मुंबई : यूझर्सच्या मोठ्या विरोधानंतर व्हॉट्सअप आपले जुने स्टेटस फीचर पुन्हा येणार आहे. नुकतेच कंपनीने नवे स्टेटस फीचर सुरु केले होते. यात तुम्ही फोटो वा व्हिडीओ ठेवू शकता. मात्र हे नवे फीचर मात्र यूझर्सना पसंत पडलेले नाहीये. त्यामुळे ट्विटरवरही याला विरोध करण्यात आला.
दर २४ तासांनी हे स्टेटस बदलावे लागते. मात्र आता जुने फीचर आणणार असल्याने २४ तासांत तुमचे स्टेटस गायब होणार नाही. तसेच तुम्ही Available, busy, At School आणि At movies असे स्टेटस ठेवू शकणार आहात.
दरम्यान, बीटा युझर्सला हा नवे फीचर मिळणार आहे. येत्या काही दिवसांत सर्व यूझर्स हे फीचर वापरु शकणार आहे. दरम्यान कधी ते मात्र कंपनीने अद्याप सांगितलेले नाहीये.
जर तुम्ही बीटा यूझर्स असाल तर व्हॉट्सअॅपच्या वर उजव्या दिशेला असलेल्या तीन डॉटवरील सेटिंग्समध्ये जा. त्यानंतर about आणि फोन नंबरच्या सेक्शनमध्ये तुम्हाला जुने स्टेटसचे ऑप्शन दिसेल.