नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी... व्हॉट्सअॅपने आपल्या अॅंन्ड्रॉइड युजर्ससाठी व्हॉइस कॉलिंगची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणताही गाजावाजा न करता व्हॉट्सअपने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअपवरून आपल्याला कॉंलिंगसुद्धा करता येणार आहे.
या फिचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप लेटेस्ट व्हर्जन २.१२.७ इंस्टॉल करावा लागणार आहे. हा लेटेस्ट व्हर्जन तुम्ही गुगल प्ले स्टोर किंवा व्हॉट्सअपच्या वेबसाईड वरून डाऊनलोड करून इंस्टॉल करू शकता.
कसे कराल व्हॉट्सअप कॉलिंग
व्हॉट्सअप लेटेस्ट वर्जन २.१२.७ इंस्टॉल केल्यानंतर ज्या मित्राकडे आधीपासूनच कॉलिंग फीचर अॅक्टिवेट आहे त्याने कॉल करणे गरजेचे आहे. तुम्ही कॉल रिसीव केल्यावर आपोआप हा कॉलिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनमध्ये अॅक्टिवेट होईल.
तुम्ही कॉल डिसकनेक्ट कराल तेव्हा तुमच्या स्मार्टफोनमध्ये कॉलिंग फिचर्स दिसू लागतील. जर ते दिसत नसतील तर फोन रिस्टार्ट करावा. एकदा का हे फीचर तुमच्या फोनमध्ये अॅक्टिवेट झालं तर तुम्ही जास्तीत जास्त मित्रांना कॉल करून त्यांना हे अॅक्टिवेट करण्यासाठी मदत करू शकतात.
एकदा का हे फीचर अॅक्टिवेट झालं की तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणालाही कॉल करू शकता. त्यासाठी समोरील व्यक्तीकडेही हे लेटेस्ट वर्जन असणे गरजेचे आहे.
ज्यांच्याकडे व्हॉट्सअप लेटेस्ट वर्जन २.१२.७ अपग्रेड नाही त्यांना तो डाऊनलोड करण्यासाठी मेसेज दिसेल.
याच बरोबर व्हॉट्सअपने अजून एक फिचर युजर्ससाठी दिलं आहे. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट असे काही कॉन्टॅक्ट्स व्हॉट्सअप सुचवणार आहे ज्यांना तुम्ही जॉइन करण्यासाठी इनवाइट करू शकता.