मुंबई : पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी बँकांबाहेर मोठी गर्दी होत आहे. बँकांमधली ही गर्दी कमी करण्यासाठी मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा वापरायला परवानगी देण्यात आली.
या परवानगीनंतर व्होडाफोन त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर घेऊन आलं आहे. पाचशे रुपयांच्या जुन्या नोटेनं रिचार्ज केलं तर व्होडाफोनच्या ग्राहकांना साडेपाचशे रुपयाचा टॉकटाईम मिळणार आहे. बँकांच्या रांगांमध्ये उभं राहून त्रस्त झालेल्या नागरिकांना व्होडाफोननं दिलेला हा दिलासा म्हणावा लागेल.