VIDEO : विमान अपघातानंतरही प्रवासी सुखरुप राहणार

गतवर्षी जगभरात विविध ठिकाणी झालेल्या विमान अपघातांमध्ये शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र आता असे होणार नाही. 

Updated: Jan 21, 2016, 11:23 AM IST
 VIDEO : विमान अपघातानंतरही प्रवासी सुखरुप राहणार title=

नवी दिल्ली : गतवर्षी जगभरात विविध ठिकाणी झालेल्या विमान अपघातांमध्ये शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र आता असे होणार नाही. 

विमान क्रॅश झाल्यास प्रवाशांना आपले प्राण वाचवता येणार आहे. एका वैज्ञानिकाने विमानाचे असे मॉडेल जारी केलेय ज्यामुळे अपघात झाल्यानंतर विमानातील प्रवासी सुखरुप राहू शकतात.

अमेरिकेचे अॅस्ट्रोनॅट डेविड अॅलेक्झांडर यांनी सोशल मीडियावर एक अॅनिमेटेड व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. यात विमानाला अपघाता झाला असता प्रवासी सुखरुप कसे वाचू शकतील याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.