VIDEO : 'कप साँग'ची शिकवणीही 'यू-ट्यूब'चीच - मिथिला

मुंबईतल्या दादर परिसरात राहणारी मिथिला पालकर या यूट्यूब हीट गर्लनं नुकतीच झी २४ तासशी संवाद साधला... यावेळी, 

Updated: Mar 17, 2016, 01:04 PM IST

मुंबई : मुंबईतल्या दादर परिसरात राहणारी मिथिला पालकर या यूट्यूब हीट गर्लनं नुकतीच झी २४ तासशी संवाद साधला... यावेळी, 

आपल्या टॅलन्टमुळे सोशल मीडियावर हिट झालेल्या मिथिलानं आपली गाण्याची अनोखी यूट्यूबवरून शिकलीय. एका इंग्रजी सिनेमात करण्यात आलेला 'कप साँग'चा प्रयोग तिला आवडला आणि आपला छंद म्हणून तिनं यूट्यूब ट्युटोरियल्समध्ये लक्ष घातलं. 'मग लक्षात आलं अरे हा ठेका तर खूप बेसिक आहे... ठेका शिकले आणि वेगवेगळी गाणं गाण्याचा प्रयत्न केला' असं मिथिला सांगते. 

पहिल्यांदा इंग्रजी गाण्यात केलेला हा प्रयोग मग मिथिलानं मराठी गाण्यावरही करून पाहिला... आणि तिचा हा प्रयोग यशस्वीही ठरला... तिच्या यूट्यूब व्हिडिओजना यूझर्सची मिळणारी पसंतीच याची साक्ष देतेय. पाहा, मिथिलानं केलेली ही बातचीत.